IPL 2021 : शाहरुख खानच्या माफीवाल्या ट्विटवर आंद्रे रसेलची प्रतिक्रिया, म्हणाला…

शाहरुख खाने ट्विटरवरुन चाहत्यांची माफी मागितली होती. दरम्यान, शाहरुख खानच्या या ट्विटवर कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने (Andre Russell) प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

IPL 2021 : शाहरुख खानच्या माफीवाल्या ट्विटवर आंद्रे रसेलची प्रतिक्रिया, म्हणाला...
Shahrukh Khan
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 7:00 PM

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) मधील पाचवा सामना काल (13 एप्रिल) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या संघांमध्ये चेन्नईतल्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकात्यावर 10 धावांनी मात केली आहे. मुंबईने कोलकात्याला 153 धावांचे आव्हान दिले होते. परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत हा सामना कोलकात्याच्या हातून हिरावला. (IPL 2021, MI vs KKR : Andre Russell responds to Shahrukh Khan’s apology tweet)

संपूर्ण सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी सूर्यकुमार यादव वगळता मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला आक्रमणाची संधी दिली नाही. आंद्रे रसेलने एकट्याने मुंबईचा अर्धा संघ तंबूत धाडला. परिणामी मुंबईने कोलकात्यासमोर 153 धावांचे माफक आव्हान उभे केले होते. त्यानंतर मैदानात आलेल्या कोलकात्याची सुरुवात खूपच चांगली झाली. या सामन्यात कोलकात्याने 8.4 षटकात बिनबाद 72 धावांपर्यंत मजल मारली होती. कोलकात्याला 68 चेंडूत 81 धावांची आवश्यकता होती. 10 विकेट हातात होत्या, तरीदेखील हा सामना कोलकात्याने गमावला. त्यामुळे संघाचा मालक शाहरुख खानलाही वाईट वाटलं. त्यामुळे शाहरुख खानने कोलकाता संघाच्या चाहत्यांची माफीदेखील मागितली.

शाहरुख खाने ट्विटरवरुन चाहत्यांची माफी मागितली होती. दरम्यान, शाहरुख खानच्या या ट्विटवर कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने (Andre Russell) प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केकेआरला जेव्हा 30 चेंडूत 31 धावांची आवश्यकता होती, तेव्हा आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिकसारख्या विस्फोटक फलंदाजांची जोडी मैदानात होती. असे असूनही कोलकात्याचा संघ 10 धावांनी पराभूत झाला. अशा परिस्थितीत शाहरुखच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रसेल म्हणाला, होय, मी शाहरुख खानच्या ट्विटचं समर्थन करतो. परंतु तुम्ही सामना संपेपर्यंत निश्चिंत होऊ शकत नाही. शेवटी हा एक क्रिकेटचा सामना आहे. आंद्रे रसेल फलंदाजीत जरी अपयशी ठरला असला, तरी त्याने गोलंदाजीत कमाल केली होती. त्याने दोन षटकात केवळ 15 धावा देत 5 बळी घेतले होते.

संबंधित बातम्या :

रोहित शर्माच्या बुटांवर नेमकं असं काय होतं, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं?

IPL 2021 | अक्षर पटेलनंतर दिल्ली कॅपिट्ल्सच्या आणखी एका स्टार खेळाडूला कोरोनाची लागण

Icc Odi Player Ranking | बाबर आझमची गरुड भरारी, विराट कोहलीला पछाडत पटकावलं पहिलं स्थान

(IPL 2021, MI vs KKR : Andre Russell responds to Shahrukh Khan’s apology tweet)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.