IPL 2021 : पहिली मॅच नाही तर चॅम्पियनशीप जिंकणं महत्त्वाचं, रोहितने रणशिंग फुकलं!
मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका यंदादेखील कायम ठेवली. | Rohit Sharma Mi vs RCB
मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात बंगळुरुने (Royal Challengers Banglore) मुंबईवर (Mumbai Indians) निसटता विजय मिळवला. या सामन्यात शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर एबी डिव्हिलियर्स (AB de villiers) धावबाद झाल्याने सामना आरसीबीच्या हातून निसटेल असं वाटत होतं. परंतु गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेलने (Harshal Patel) शेवटची धाव घेत सामना जिंकण्यात मोलाची भूमिका निभावली. मुंबईने गेल्या आठ वर्षांची परंपरा कायम ठेवत नवव्या वर्षीही सलामीचा सामना गमावला. सामना संपल्यानंतर समालोचकाने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) याचविषयी विचारलं असता पहिली मॅच नाही तर चॅम्पियनशीप जिंकणं महत्त्वाचं, असं धडाकेबाज उत्तर रोहितने दिलं. (IPL 2021 Mi vs RCB First Match Winning is Not important Championship Winning Is important Says Rohit sharma)
पहिली मॅच नाही तर चॅम्पियनशीप जिंकणं महत्त्वाचं आहे. खूप चांगली मॅच झाली. मला आनंद आहे की आम्ही सहजासहजी बंगळुरुला मॅच जिंकू दिली नाही. परंतु प्रथम बॅटिंग करताना आमच्या 20 धावा कमी झाल्या. साहजिकच आम्ही आमच्या बॅटिंवर खूश नाहीय. आम्ही या सामन्यात काही चूका केल्या. मात्र पुढे जाताना आम्हाला त्या चुका विसरुन जाव्या लागतील. बॅटिंग करण्यासाठी पीच फारसं चांगलं नव्हतं. याबद्दल इथून पुढे आम्हाला विचार करायवला हवा, असं रोहित म्हणाला.
सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका यंदादेखील कायम
मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका यंदादेखील कायम ठेवली. 2013 पासून आतापर्यंत दरवर्षी मुंबई इंडियन्स आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभूत होत आहे. ही पराभवाची मालिका यंदा खंडित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु मुंबईतला ही पराभवाची मालिका थांबवता आलेली नाही. सलग 9 वर्ष मुंबई सलामीच्या सामन्यात पराभूत झाली आहे. या 9 वर्षात मुंबईने पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे, परंतु सलामीच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही.
थरारक सामन्यात बंगळुरु विजयी
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरुने 8 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण केलं. बंगळुरुकडून एबी डीव्हीलियर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी बंगळुरूकडून जलदगती गोलंदाज हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेत मुंबईचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये पाठवला होता. या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हे ही वाचा :
IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त, रोहितसह विराटही चिंतेत!
IPL 2021 : विराट कोहलीला हरवलेला खेळाडू सापडला, 8 वर्षानंतर कोहिनूर हिरा मैदानात उतरला!