MI vs RCB IPL 2021 : सुर्यकुमार यादवने सांगितलं रोहित शर्माचं टॉप सिक्रेट, जर ‘असं’ झालं तर मुंबईचा विजय निश्चित!

आयपीएलच्या 2021 च्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यादरम्यान खेळविला जाणार आहे. | MI vs RCB

MI vs RCB IPL 2021 : सुर्यकुमार यादवने सांगितलं रोहित शर्माचं टॉप सिक्रेट, जर 'असं' झालं तर मुंबईचा विजय निश्चित!
सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 12:36 PM

चेन्नई : आयपीएल 2021 (IPL 2021) चे बिगुल आज वाजत आहे. सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यादरम्यान खेळविला जाणार आहे. या सामन्याचा निकाल काय लागेल, कोण कुणावर वरचढ ठरेल, हे मैदानातली लढाई संपल्यानंतरच कळेल. परंतु त्याआधी, मुंबई इंडियन्सचा 30 वर्षीय फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मुंबईचा कर्णधार रोहित शर्माविषयी (Rohit Sharma) एक मोठं गुपित सांगितलं आहे. (IPL 2021 Mumbai Indians Suryakumar Yadav reveal Secret Rohit Sharma)

रोहित इतरांपेक्षा वेगळा कर्णधार

सूर्यकुमार यादव म्हणाला, “रोहित शर्मा आयपीएलमध्ये कमालीचं प्रदर्शन करतो. त्यामुळेच तर त्याने मुंबईला 5 वेळा जेतेपदाचा करंडक मिळवून दिलाय. रोहित शर्मा मैदानावर दिसतो त्यापेक्षा तो कितीतरी पटीने वेगळा आहे. फिल्डवर असताना रोहित शर्माला प्रत्येकजण पाहत असतो. परंतु मला तो ऑफ फिल्ड असताना एकदम परफेक्ट असतो.”

“त्याच्या स्वभावाच्या अनुरुप तो संघातील सहकाऱ्यांची नेहमी मस्करी करत असतो. तो फनलव्हिंग आहे. ज्यामुळे संघातील सहकाऱ्यांशी त्याचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. जी गोष्ट रोहित शर्माला इतरांपेक्षा वेगळं बनविते”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

रोहितसमोर रॉयल चॅलेंज

रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा विजेत्या संघाचा भाग राहिलेला आहे. मुंबईचा इतिहास पाहता पाठीमागच्या 8 मोसमात मुंबईने सलामीची लढत जिंकलेली नाही. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मुंबईला लढत गमवावी लागली. मात्र आज रोहितसमोर रॉयल चॅलेंज आहे. चेन्नईमध्ये आजचा सामना होत आहे. जिथे कर्णधार म्हणून रोहितची शानदार कामगिरी राहिली आहे. आता 8 वर्षांपासूनचा खराब रेकॉर्ड मुंबई तोडते की बंगळुरु ‘रॉयल’ खेळते , हे पाहणे महत्वाचे आहे.

सलामीचा सामना गमविण्याचा खराब रेकॉर्ड मुंबईच्या नावावर

5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईच्या नावावर एका खराब कामगिरीची नोंद आहे. मुंबई इंडियन्सने 2013 पासून आतापर्यंत एकदाही स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकलेला नाही. आयपीएल 2013 च्या मोसमातही मुंबईला आरसीबीच्या हातून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा त्या सामन्यात रिकी पॉन्टिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. जसप्रीत बुमराहने याच सामन्याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. 2013 पासून आतापर्यंत आयपीएलचे 7 हंगाम संपुष्टात आले आहेत, परंतु मुंबई इंडियन्सने आजपर्यंत आयपीएलचा सलामीचा सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत आता 8 व्या हंगामात तरी हा इतिहास बदलतो की त्याची पुनरावृत्ती होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(IPL 2021 Mumbai Indians Suryakumar Yadav reveal Secret Rohit Sharma)

हे ही वाचा :

IPL 2021 : 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईच्या नावावर हा खराब रेकॉर्ड, रो’हिट’सेना इतिहास बदलणार?

IPL 2021 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.