IPL 2021 MI vs SRH : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे, केव्हा?

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील आज 9 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) यांच्यात रंगणार आहे. (IPL 2021 Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad live Streaming)

IPL 2021 MI vs SRH : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे, केव्हा?
IPL 2021 MI vs SRH
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 11:25 AM

चेन्नई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील आज 9 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) यांच्यात रंगणार आहे. ही लढत चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळविण्यात येणार आहे. मुंबईने खेळलेल्या 2 सामन्यांपैकी एका सामन्यात हार तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे हैदराबादला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ विजयी सुरुवात करण्यास आसुसलेला असेल तर कोलकात्याला नमवून विजयाची लय सापडलेला मुंबई संघ दुसऱ्या विजयाच्या आशाने मैदानात उतरेल. (IPL 2021 Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad live Streaming when And Where To watch Online Free In Marathi 17 April 2021)

सनरायजर्स हैदराबाद

सनरायजर्स हैदराबादसाठी या मोसमाची सुरुवात चांगली राहिली नाही. सुरुवातीचे दोन्ही सामने हैदराबादने गमावले आहेत. हैदराबादच्या बोलर्स शानदार बोलिंग करत आहेत मात्र आतापर्यंत फलंदाजांनी निराशा केली आहे. टीमचा आशेचा किरण केन विल्यमसन आणखीही पूर्ण फिट नाहीय. त्यामुळे तो बॅक बेंचवर बसून आहे. त्याला संपूर्ण ठीक व्हायला आणखीही एक आठवडा लागू शकतो. अशातच आजच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबाद संघात फलंदाजीमध्ये काही बदल दिसू शकतात. आजच्या मॅचमध्ये मनीष पांडे किंवा साहा यादोघांपैकी एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्स

मुंबई बंगळुरुविरुद्धचा पहिला सामना शेवटच्या चेंडूवर गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोमांचक विजय मिळवला. वास्तविक मुंबईने दुसऱ्या सामन्यात फार काही चांगलं प्रदर्शन केलं नाही किंवा जास्त धावा केल्या नाही पण मुंबईच्या बोलर्सने दुसऱ्या सामन्यात मुंबईला विजय मिळवून दिला, असं म्हणता येईल. हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. परंतु जर काही बदल झालाच तर मार्को जेन्सनच्या ऐवजी नॅथन कुल्टर नाईलला संधी मिळू शकते.

सामना कधी आणि कुठे…?

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad)यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील नववा सामना आज 17 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही Tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad live Streaming when And Where To watch Online Free In Marathi 17 April 2021)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘धोनीला म्हातारपणाची जाणीव’, 200 सामने पूर्ण करताच मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ…

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर के एल राहुलला दु:ख, म्हणतो, ‘माझ्याजवळ बोलायला…’

पंजाबच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या दीपक चहरच्या खांद्यावर धोनीला द्यायचीय ‘ही’ नवी जबाबदारी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.