IPL 2021 : “मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन”

मुंबईला हरवणं इतर संघासाठी मोठी कठीण गोष्ट असेल, असं वक्तव्य सुनील गावस्कर यांनी केलं आहे. (Mumbai Indians Will be hard to beat Sunil Gavaskar)

IPL 2021 : मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन
Mumbai Indians
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 3:00 PM

मुंबईभारत आणि इंग्लंड (India Vs England) यांच्यातील एकदिवसीय मालिका पार पडल्यानंतर क्रिकेट रसिकांना आता आयपीएलचे (IPL 2021) वेध लागले आहेत. येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. पहिलाच सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळविली जाणार आहे. अशातच भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मुंबई इंडियन्सशी संबंधित मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईला हरवणं इतर संघासाठी मोठी कठीण गोष्ट असेल, असं वक्तव्य गावस्कर यांनी केलं आहे. (IPL 2021 Mumbai Indians Will be hard to beat Sunil Gavaskar)

मुंबईला हरवणं कठीण गोष्ट

एचटी मीडियाच्या रिपोर्टनुसार सुनील गावस्कर म्हणाले, या हंगामात मुंबईला हरवणं इतर संघांसाठी मोठी कठीण गोष्ट असेल. मुंबईच्या खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता खरंच मुंबईला हरवणं प्रतिस्पर्ध्यांना वाटतं तेवढं सोपं नाहीय. इशान किशन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या अशा एकापेक्षा एक खेळाडूंचा मुंबईच्या संघामध्ये भरणा आहे. त्यामुळे मुंबईला हरवणं कठीण आहे, असा दावा गावस्कर म्हणाले.

हार्दिक पांड्याने बोलिंग टाकणं महत्त्वाचं

हार्दिक पांड्याने बोलिंग टाकणं संघासाठी महत्त्वाचं आहे मग ते मुंबईसाठी असो वा भारतीय संघासाठी… हार्दिक तिन्ही फॉरमॅटसाठी सर्वोत्तम खेळाडू आहे. जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशीपची अंतिम लढत होत आहे. त्यामुळे अजूनही हार्दिककडे वेळ आहे, असं गावस्कर म्हणाले.

मुंबई इंडियन्सचे खेळाडू कॅम्पसाठी दाखल

इंग्लंडविरुद्धची मालिका यशस्वीपूर्ण पार पाडत भारताचे खेळाडू आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमासाठी आपापल्या फ्रेंचायजीच्या कॅम्पसाठी रवाना होत आहेत तर काही खेळाडू कॅम्पमध्ये दाखल आहेत. मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सिक्सर किंग हार्दिक पांड्या (Hardik Pandya), क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने ट्विट करुन तशी माहिती दिली आहे.

मुंबईच्या कॅम्पमध्ये रोहित शर्मा दाखल

9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी विविध संघांचे कॅम्प सुरु झाले आहेत. मुंबई इंडियन्सचं सराव शिबीर मुंबईतच आयोजित करण्यात आलंय. त्याचनुसार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपण मुंबई इंडियन्स संघाच्या शिबीरात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच

इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्थात आयपीएलच्या पाठीमागील हंगामातील विजेता संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 14 व्या हंगामासाठी नवी जर्सी लाँच केली आहे. ब्रह्माण्डातील पाच मूलतत्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे या जर्सीवर दाखवण्यात आले आहेत.

आयपीएलचं रण सज्ज

IPL 2021 Date And Schedule : इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(IPL 2021 Mumbai Indians Will be hard to beat Sunil Gavaskar)

हे ही वाचा :

‘क्या कमाल का खिलाडी हैं’…, इंझमामची रिषभ पंतवर स्तुतीसुमने

IPL 2021 : ज्या गोलंदाजांना धू-धू धुतलं, आता त्यांच्याच बचावासाठी रिषभ पंतला सिक्सर मारावे लागणार!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.