IPL Suspended : जॉस बटलरकडून भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वालला खास भेट, ट्विटरवर शेअर केला फोटो
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जॉस बटलरने (Jos Buttler) भारताचा नवोदित खेळाडू यशस्वी जैस्वालला (Yashsvi Jaiswal) एक खास भेटवस्तू दिली आहे. बटलरने त्याची बॅट यशस्वीला भेट दिली आहे. या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. (IPL 2021 Rajasthan Royals Jos buttler Special Gift To yashsvi Jaiswal)
मुंबई : इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जॉस बटलरने (Jos Buttler) भारताचा नवोदित खेळाडू यशस्वी जैस्वालला (Yashsvi Jaiswal) एक खास भेटवस्तू दिली आहे. बटलरने त्याची बॅट यशस्वीला भेट दिली आहे. या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. आयपीएलमध्ये सध्या दोघेही राजस्थान रॉयल्सकडून खेळतात तसंच सलामीवीर म्हणून राजस्थानच्या डावाची सुरुवात करतात. या मोसमातील काही सामन्यांत दोघांनीही राजस्थानला उत्तम सुरुवात करुन देण्याचा प्रयत्न केला. (IPL 2021 Rajasthan Royals Jos buttler Special Gift To Yashsvi Jaiswal)
दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे तसंच खेळाडू-सपोर्ट स्टाफ आणि लीगमधील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बीसीसीआयने घेतला. या निर्णयाची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. पुढील सामन्यांचं आयोजन कधी होईल, कुठे होईल, याबाबत मात्र सद्यस्थितीत कोणतीही माहिती देण्यात आली नाही किंबहुना याविषयावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
यशस्वी तू तुझ्या क्षमतेचा आणि प्रतिभेचा फायदा घे…!
राजस्थान रॉयल्सने एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये बटलरने त्याची बॅट यशस्वीला भेट दिल्याचे फोटो आहेत. त्यातल्या एका फोटोत बटलरने खास यशस्वीसाठी मेसेज दिलाय. “यशस्वी तू तुझ्या क्षमतेचा आणि प्रतिभेचा फायदा घे”, अशा शब्दात जॉस बटलरने यशस्वी जैस्वालला शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्या बॅटने बटलरने हैदराबादलं ठोकलं, तीच बॅट यशस्वीला भेट
यंदाच्या आयपीएलमध्ये बटलरने हैदराबादविरुद्ध 64 बॉलमध्ये 124 रन्सची शानदार खेळी केली. ज्या बॅटने बटलरने आयपीएलमध्ये शतक ठोकलं तीच बॅट त्याने यशस्वीला भेट म्हणून दिली आहे.
A special gift from a special opening partner. ?#HallaBol | #RoyalsFamily | @yashasvi_j | @josbuttler pic.twitter.com/VE3QIE0kct
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 4, 2021
बीसीसीआयच्या प्रतिक्षेत विदेशी खेळाडू
आयपीएलचा 14 वा मोसम पुढे ढकलल्याने सध्या विदेशी खेळाडू भारतात असून त्यांना आपापल्या मायदेशात जाण्यासाठी बीसीसीआयची अनुमती हवी आहे. अनुमती मिळताच विदेशी खेळाडू आपापल्या देशात जाण्यासाठी रवाना होतील.
(IPL 2021 Rajasthan Royals Jos buttler Special Gift To yashsvi Jaiswal)
हे ही वाचा :
IPL 2021 : आयपीएल स्थगित झाल्यानंतरची सर्वांत मोठी बातमी, पोलिसांकडून 2 जणांना बेड्या, कारण काय?
IPL 2021 : कोरोनापुढे आयपीएल हरलं पण या खेळाडूंनी क्रिकेट रसिकांच्या हृदयावर राज्य केलं!