IPL 2021: पहिल्या मॅचमध्ये संजूने दिली नाही स्ट्राईक, दुसऱ्या मॅचमध्ये चमकला ख्रिस मॉरिस!
राजस्थानच्या विजयाची नौका ख्रिस मॉरीसने बहादुरपणे पार करुन दाखवली आणि डगआऊटमध्ये बसलेल्या संजू सॅमसनला विचार करायला भाग पाडलं की "पंजाबविरुद्धच्या सामन्यात मला स्ट्राईक द्यायला हवी होती..." (IPL 2021 Rajasthan Royals Vs Delhi Capital Chris morris Hit 4 Sixes)
मुंबई : राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील (Rajasthan Royals Vs Delhi Capital) अटीतटीच्या झालेल्या लढतीत ख्रिस मॉरिसच्या (Chris Morris) झंझावाती खेळीने राजस्थानला सुंदर विजय मिळाला आणि दिल्लीला (Delhi Capitals) 3 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. सुरुवातीलाच राजस्थानच्या 5 विकेट्स घेऊन दिल्लीने सामना अर्धा खिशात घातला होता मात्र डेव्हिड मिरलचं (David Miller) झुंझार अर्धशतक आणि मॉरिसने खेळलेल्या आक्रमक खेळीने दिल्लीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सगळ्यात एक गोष्ट लक्षवेधी ठरली. पंजाबविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा नवोदित कर्णधार संजू सॅमसने जेव्हा 1 बॉल 5 धावांची गरज होती तेव्हा ख्रिस मॉरिसवर विश्वास ठेवला नव्हता, त्याने स्वत: तो चेंडू खेळला होता. मात्र त्याला सामना जिंकवून देण्यात अपयश आलं. मात्र पहिल्या मॅचमध्ये संधी मिळाली नाही तर काय झालं, दुसऱ्या मॅचमध्ये संधी मिळताच ख्रिस मॉरिस चमकला आणि दिल्लीविरुद्ध शानदार 4 षटकार खेचून राजस्थानला विजय मिळवून दिला. (IPL 2021 Rajasthan Royals Vs Delhi Capital Chris morris Hit 4 Sixes)
मिलरने रचला विजयाचा पाया, मॉरिस झालासी कळस
टॉस जिंकून राजस्थानने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीची अतिशय खराब सुरुवात झाली. पहिल्याच पॉवरप्ले मध्ये दिल्लीने टॉप ऑर्डर्सच्या 3 विकेट्स गमावल्या. दिल्लीच्या टिच्चून माऱ्यासमोर कर्णधार रिषभ पंतचं अर्धशतक वगळता दुसरा कोणताही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. अखेर दिल्लीने राजस्थानसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरदाखल बॅटिंगसाठी उतरलेल्या राजस्थानच्या संघांची सुरुवात देखी अतिषय खराब झाली. राजस्थानच्या पहल्या 5 विकेट्स तर केवळ 42 रन्सवर पडल्या होत्या. मग डावाची सूत्रे डेव्हिड मिलरने हाती घेतली. बॅट्समन आऊट झालेले असताना त्याने त्याचा अजिबातही विचार न करता आक्रमक फटके सुरुच ठेवले. यादरम्यान त्याने खणखणीत अर्धशतक झळकावलं.
धावगती वाढवण्याच्या नादात मिलर कॅचआऊट झाला. आता सगळी जबाबदारी ख्रिस मॉरिसवर आली होती. त्याने थंड डोक्याने खेळ केला. बोलिंगमध्ये कमाल केलेला जयदेव उनाडकट मॉरिसच्या साथीला होता. या दोघांना मिळून राजस्थानच्या विजयाची नौका पार करायची होती. त्यांनी त्याचं काम उत्तम केलं. राजस्थानने 16 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या तसंच आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या ख्रिस मॉरिसने कमाल केली. त्याने केवळ 18 चेंडूत बेधडक 36 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने एकही चौकार न मारत गगनचुंबी 4 षटकार मारले.
ख्रिस मॉरिसने संजूला विचार करायला भाग पाडलं…!
राजस्थानच्या विजयाची नौका ख्रिस मॉरीसने बहादुरपणे पार करुन दाखवली आणि डगआऊटमध्ये बसलेल्या संजू सॅमसनला विचार करायला भाग पाडलं की “पंजाबविरुद्धच्या सामन्यात मला स्ट्राईक द्यायला हवी होती…”
संजू सॅमसन आणि ख्रिस मॉरिस यांच्यातला प्रसंग काय…?
पंजाबविरुद्धच्या सामन्यात राजस्थान संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. पंंजाबचा कर्णधार के एल राहुलने बॉल अर्शदीप सिंगच्या हाती दिला. स्ट्राईकला होता संजू सॅमसन… अर्शदीपने पहिलाच बॉल अतिशय उत्तम टाकला. ज्याच्यावर कोणताही रन्स निघाला नाही. अर्शदीपच्या दुसऱ्या चेंडूवर सॅमसनने एक रन घेतला. तिसऱ्याही चेंडूवर म़ॉरिसने एक धाव घेऊन स्टाईक पुन्हा संजूला दिली. साहजिक दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर फलंदाजाला आक्रमक फटका मारण्याची संधी अर्शदीपने दिली नाही.
अर्शदीपच्या चौथ्या बॉलवर संजू सॅमसनने उत्तुंग षटकार खेचला. पाचवा बॉल सॅमसनने सीमारेषेबाहेर धाडायचा प्लॅन आखला परंतु सीमारेषेवर असलेल्या फिल्डरने तो बॉल अडवला. यावेळी एक धाव सहज निघाली असती परंतु आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या संजूने धाव न घेण्याचा निर्णय घेतला, त्याने ख्रिस मॉरिसला अर्ध्या पीचमधून परत पाठवलं आणि शेवटच्या चेंडूवर 5 धावा लागत असताना मी षटकार ठोकून मॅच जिंकवू शकतो, या आत्मविश्वासाने त्याने सहावा चेंडू खेळला. 1 बॉल 5 रन्सची गरज असताना त्याने उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ दीपका हुडाकडे कॅच दिला.
संजूचा मॉरिसवर विश्वास नाही?
तत्पूर्वी पाचव्या बॉलवर एक रन्स निघत होता. तरीही संजूने रन्स न घेता ख्रिस मॉरिसला अर्ध्या पीचमधून परत पाठवलं. संजूच्या याच निर्णयाची आता चर्चा होते आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा म्हणजे 16.50 कोटी रुपये बोली लागलेला खेळाडू असलेल्या ख्रिस मॉरिसवर संजूचा विश्वास नाही का? असा सवाल मॅछ पाहणाऱ्या प्रत्येका्च्या मनात आला.
(IPL 2021 Rajasthan Royals Vs Delhi Capital Chris morris Hit 4 Sixes)
हे ही वाचा :