IPL 2021 चे उर्वरित सामने UAE मध्ये, 29 मे रोजी BCCI घोषणा करणार?

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या मोसमातील उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आयोजित केले जाऊ शकतात.

IPL 2021 चे उर्वरित सामने UAE मध्ये, 29 मे रोजी BCCI घोषणा करणार?
ipl 2021 trophy
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 5:11 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या मोसमातील उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आयोजित केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्टनुसार 29 मे रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) सर्वसाधारण बैठकीमध्ये (SGM) याची घोषणा केली जाऊ शकते. गेल्या वर्षीही आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आलं होतं. (IPL 2021 reamaining matches will organize in UAE in September-October)

इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्यांमध्ये 9 दिवसाचे अंतर आहे. अहवालानुसार, बीसीसीआय दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटीमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या दोन सामन्यांमधील अंतर 5 दिवसांनी कमी केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलसाठी अधिक वेळ मिळेल. तथापि, बीसीसीआयने अद्याप यासाठी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) औपचारिक विनंती केलेली नाही.

30 दिवसात 31 सामने खेळवणार?

भारताचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबरला संपेल. अशा परिस्थितीत भारत-इंग्लंड मालिकेत कोणताही बदल झाला नाही तरी टी – 20 वर्ल्ड कपपूर्वी बीसीसीआयकडे एक महिन्याची (15 सप्टेंबर – 15 ऑक्टोबर) विंडो असेल. या 30 दिवसांत भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना ब्रिटनहून युएईला आणण्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे. बाद फेरीसाठी 5 दिवस बाजूला ठेवावे लागतील. अशा परिस्थितीत भारतीय बोर्डाकडे 27 सामने पूर्ण करण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी असेल. या विंडोमध्ये 8 शनिवार-रविवार आहेत. याचा अर्थ असा आहे की शनिवार व रविवारी 16 सामने (डबल हेडर) खेळवले जाऊ शकतात. उर्वरित 19 दिवसांत 11 सामने खेळवता येतील.

अन्यथा 3000 कोटींचं नुकसान

आयपीएलचा 14 वा हंगाम पुन्हा सुरु न झाल्यास किंवा उर्वरित सामने खेळवता आले नाहीत तर बीसीसीआयला सुमारे 3000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत 14 वे सत्र पूर्ण करायचे आहे. बीसीसीआयला आशा आहे की टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी परदेशी खेळाडूदेखील आयपीएलमध्ये भाग घेतील.

…म्हणून IPL इंग्लंडऐवजी यूएईमध्ये

बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवू शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यासाठी इंग्लंडऐवजी यूएईची निवड करण्यामागे तीन कारणं आहेत.

पहिलं कारण – इंग्लंडमध्ये स्पर्धा घेणे उचित नसू शकते. कारण सप्टेंबरमध्ये तिथे पावसाळा असतो. अशा परिस्थितीत सामने पार पडतील की नाही, याबाबत शंका आहे. दुसरीकडे सप्टेंबरमध्ये युएईचेहवामान अधिक चांगले असते. तिथे सप्टेंबरमध्ये पावसाचा धोका नाही.

दुसरं कारण – इंग्लंडमध्ये स्पर्धा आयोजित करणे युएईच्या तुलनेत एक महागडा व्यवहार आहे. कारण, बीसीसीआयला तेथे पाउंडमध्ये पैसे द्यावे लागतील. युएईमध्ये दिरहममध्ये कमी खर्चात स्पर्धा पार पडेल.

तिसरं कारण –  आयपीएल स्पर्धा यापूर्वी युएईमध्ये झाल्या आहेत आणि त्या यशस्वीही झाल्या आहेत. 13 वा हंगाम यूएईमध्ये पार पडण्याअगोदर 2014 हंगामातील काही आयपीएलचे सामनेही तिथे खेळले गेले होते.

बीसीसीआयच्या बैठकीत 29 मेला मोठी घोषणा

आयपीएलचा 13 वा मोसम यूएईमध्ये यशस्वीपणे पार पडला होता. त्यामुळे युएईमध्येच आयपीएल 2021 चा 14 हंगाम आयोजित करावा, अशी मागणी होत होती. पण बीसीसीआयने धाडसाने भारतातील 6 शहरांत स्पर्धेचं नियोजन केलं. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धी निम्म्यातच तहकूब करावी लागली. उर्वरित सामन्यांसाठी 2 वेळापत्रकांसह बीसीसीआय सज्ज आहे. येत्या 29 मे रोजी बीसीसीआयच्या एसजीएम बैठकीच्या टेबलावर ते वेळापत्रक ठेवतील.

संबंधित बातम्या

इंग्लंडच्या एका निर्णयावर IPL 2021 चं भवितव्य अवलंबून, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB साद देणार?

इंग्लंड दौऱ्यावर अर्धा डझन वेगवान गोलंदाज, पण सगळ्यात खतरनाक कोण? VVS लक्ष्मणने सांगितलं नाव!

Rahul Dravid : राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा, श्रीलंका दौरा गाजवणार?

(IPL 2021 reamaining matches will organize in UAE in September-October)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.