IPL 2021 : मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन करण्याचा निर्धार, रोहित शर्मा मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल!

सहाव्यांदाही प्रतिस्पर्धी संघांना मात देऊन लकाकणारी आयपीएल ट्रॉफी उंचावण्याच्या निर्धाराने रोहित शर्मा मुंबईत सुरु असलेल्या कॅम्पसाठी दाखल झाला आहे. | IPL 2021 Rohit Sharma Join MI Camp

IPL 2021 : मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन करण्याचा निर्धार, रोहित शर्मा मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल!
रोहित शर्मा, कर्णधार, मुंबई इंडियन्स
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 9:31 AM

मुंबई :  इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवून (India vs England) भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आगामी आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 14 व्या हंगामासाठी मुंबईच्या कॅम्पसाठी (Mumbai Indians Camp) पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा विजेतेपदाची ट्रॉफी मिळवून देण्यासाठी रोहित प्रयत्नांची पराकष्ठा करेल. आतापर्यंत रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या टीमने 5 वेळा आयपीएल जेतेपदाची ट्रॉफी मिळवली आहे. आता सहाव्यांदाही प्रतिस्पर्धी संघांना मात देऊन लकाकणारी आयपीएल ट्रॉफी उंचावण्याच्या निर्धाराने रोहित शर्मा मुंबईत सुरु असलेल्या कॅम्पसाठी दाखल झाला आहे.  (IPL 2021 Rohit Sharma Join Mumbai Indians Camp in Mumbai)

मुंबईच्या कॅम्पमध्ये रोहित शर्मा दाखल

9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी विविध संघांचे कॅम्प सुरु झाले आहेत. मुंबई इंडियन्सचं सराव शिबीर मुंबईतच आयोजित करण्यात आलंय. त्याचनुसार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपण मुंबई इंडियन्स संघाच्या शिबीरात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

मुंबईत कोण कोण पोहोचलं…??

मुंबई इंडियन्सचे हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि सूर्यकुमार यादव 9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या हंगामासाठी सुरु असलेल्या सराव शिबीरासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने आपल्या ट्विटरवरुन या तिघांचाही फोटो ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे.

मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच

इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्थात आयपीएलच्या पाठीमागील हंगामातील विजेता संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 14 व्या हंगामासाठी नवी जर्सी लाँच केली आहे. ब्रह्माण्डातील पाच मूलतत्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे या जर्सीवर दाखवण्यात आले आहेत.

आयपीएलचं रण सज्ज

IPL 2021 Date And Schedule : इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(IPL 2021 Rohit Sharma Join Mumbai Indians Camp in Mumbai)

हे ही वाचा :

IPL 2021 : धोनीच्या नेतृत्वात बोलर्सला खेळायला का आवडतं?, चेन्नईच्या करोडपती खेळाडूने सांगितली ‘राज की बात’!

IPL 2021 : RCB चे दिग्गज चेन्नईला जमायला सुुरुवात, विराट या दिवशी कॅम्पसाठी रवाना होणार!

IND vs ENG : सॅम करनच्या जबरदस्त खेळीमागे महेंद्रसिंह धोनीचा हात?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.