IPL 2021 PBKS vs RCB Live Streaming : पंजाब विरुद्ध बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 PBKS vs RCB Live Streaming : आयपीएलच्या (IPL 2021) महत्त्वपूर्ण सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore vs punjab Kings) यांच्यात टक्कर होईल.

IPL 2021 PBKS vs RCB Live Streaming : पंजाब विरुद्ध बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?
PBKS vs RCB
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 2:16 PM

अहमदाबाद : आयपीएलच्या (IPL 2021) महत्त्वपूर्ण सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore vs punjab Kings) यांच्यात टक्कर होईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी साडे सात वाजता खेळला जाईल. पॉईंट टेबलमध्ये आपले स्थान बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे, तर पंजाबची लढाई प्लेऑफ स्पर्धेत स्वत: ला जिवंत ठेवण्यासाठी असेल. (IPL 2021 Royal Challengers Banglore vs punjab kings live Streaming When And Where To watch online In Marathi)

दोन्ही संघाची आयपीएलच्या 14 व्या पर्वातील कामगिरी नेमकी कशी?

आयपीएलच्या 14 व्या पर्वाची सुरुवात बंगळुरुने दणक्यात केली आहे. बंगळुरुने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅप्टन कूलच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने केवळ बंगळुरुला हरवलं आहे. उर्वरित पाचही सामन्यात बंगळुरुने विजय संपादन केलेला आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्ज संघाने खेळलेल्या सहा सामन्यांपैकी केवळ दोन सामन्यांत पंजाबला विजय मिळवता आला आहे. बाकी चार सामन्यांत पंजाबला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

इतिहासात पंजाब वरचढ, पण बंगळुरुचा संघ सध्या फॉर्मात

पंजाबची फलंदाजी ही त्यांच्यासाठी आतापर्यंत डोकेदुखी ठरली आहे. फलंदाजांमुळेच त्यांना वारंवार पराभवाला सामोरे जावं लागत आहे. दुसरीकडे बंगळुरुचा संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. विराटसेनेला रोखायचं मोठं आव्हान राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब संघासमोर असणार आहे. दोन्ही संघात आतापर्यंत 26 वेळा सामना रंगला आहे. यातील 14 सामने पंजाबने जिंकले आहेत तर 12 सामने बंगळुरुने जिंकले आहेत.

सामना कधी आणि कुठे…?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यातील सामना आज 30 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 Royal Challengers Banglore vs punjab kings live Streaming When And Where To watch online In Marathi)

हे ही वाचा :

IPL 2021 : स्टेडियममध्ये बसलेली ही मुलगी कोण?, जिच्यासमोर षटकार मारताच राहुल चहर रागाने लालबुंद झाला!

IPL 2021 : गेल डिव्हिलियर्सला विसराल, विराट कोहलीविरुद्ध पदार्पण करणार हे 100 नंबरी सोनं!

IPL 2021 : सलग 6 बॉलवर 6 चौकार खाल्ल्यानंतर शिवम मावीने दाबला पृथ्वी शॉ चा गळा!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.