IPL 2021 : ‘उडता संजू’, हवेत सूर मारत धवनचा कॅच, ‘गब्बर’ही हैरान!

जयदेव उनाडकटच्या ओव्हरमध्ये शिखर धववने दिल स्कूप शॉट खेळला. चपळ संजूने क्षणाचाही विलंब न लावता हवेत सूर मारला आणि शिखरचा अविश्वसनीय कॅच पडला. (IPL 2021 RR vs DC Sanju Samson Taking Fantastic Catch Shikhar Dhawan)

IPL 2021 : 'उडता संजू', हवेत सूर मारत धवनचा कॅच, 'गब्बर'ही हैरान!
संजू सॅमसनने शिखर धवनचा अफलातून कॅच घेतला...
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 9:36 AM

मुंबई :  आयपीएल 2021 स्पर्धेतील सातव्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात लढत पार पाडली. दिल्लीने विजयासाठी राजस्थानला 148 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) सर्वाधिक 51 धावांची खेळी केली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या राजस्थानच्या फलंदाजांनी दिल्लीने दिलेलं आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केलं. ख्रिस मॉरीसने (Chris morris) अखेरच्या दोन षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे. तत्पूर्वी या सामन्यातील काही क्षणांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यातीलच एक म्हणजे संजू सॅमसने (Sanju Samson) शिखर धवनचा (Shikhar Dhawan) घेतलेला कॅच…! (IPL 2021 RR vs DC Sanju Samson Taking Fantastic Catch Shikhar Dhawan)

संजूचा अप्रतिम कॅच… धवनही हैरान…!

टॉस जिंकून राजस्थानने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीला शिखर धवन- पृथ्वी शॉ ही जोडी मैदानात आली. जयदेव उनाडकटच्या ओव्हरमध्ये शिखर धववने दिल स्कूप शॉट खेळला. मात्र त्याच्या बॅटची कड घेऊन बॉल विकेट किपरच्या बाजूने निघाला. चपळ संजूने क्षणाचाही विलंब न लावता हवेत सूर मारला आणि अविश्वसनीय कॅच पडला. संजूने एवढा अवघड कॅछ पकडला, यावर काही क्षण शिखर धवनने देखील विश्वास ठेवला नाही. तो संजूकडे पाहत राहिला. पण संजूने एवढ्या आत्मविश्वासने सूर मारुन कॅच घेतला होता की धनवला तंबूत जायला लागले.

दिल्लीची अतिशय खराब सुरुवात झाली. पहिल्याच पॉवरप्ले मध्ये दिल्लीने टॉप ऑर्डर्सच्या 3 विकेट्स गमावल्या. दिल्लीच्या टिच्चून माऱ्यासमोर कर्णधार रिषभ पंतचं अर्धशतक वगळता दुसरा कोणताही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. अखेर दिल्लीने राजस्थानसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

राजस्थानचं दिल्लीच्या पावलावर पाऊल, टॉप ऑर्डर बॅट्समन अपयशी!

प्रत्युत्तरदाखल बॅटिंगसाठी उतरलेल्या राजस्थानच्या संघांची सुरुवात देखील अतिषय खराब झाली. राजस्थानच्या पहल्या 5 विकेट्स तर केवळ 42 रन्सवर पडल्या होत्या. मग डावाची सूत्रे डेव्हिड मिलरने हाती घेतली. बॅट्समन आऊट झालेले असताना त्याने त्याचा अजिबातही विचार न करता आक्रमक फटके सुरुच ठेवले. यादरम्यान त्याने खणखणीत अर्धशतक झळकावलं.

अखेर राजस्थानच्या फलंदाजांनी दिल्लीने दिलेलं आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केलं. ख्रिस मॉरीसने अखेरच्या दोन षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला.

(IPL 2021 RR vs DC Sanju Samson Taking Fantastic Catch Shikhar Dhawan)

हे ही वाचा :

IPL 2021 : रिषभ पंतला आऊट केल्यावर खेळाडू मैदानातच नाचला, Video व्हायरल

IPL 2021: पहिल्या मॅचमध्ये संजूने दिली नाही स्ट्राईक, दुसऱ्या मॅचमध्ये चमकला ख्रिस मॉरिस!

RR vs DC, IPL 2021 Match 7 Result | ख्रिस मॉरीसचा ‘हल्ला बोल’, रंगतदार सामन्यात राजस्थानची दिल्लीवर 3 विकेट्सने मात

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.