IPL 2021 RR vs PBKS live streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा?
IPL 2021 RR vs PBKS live streaming : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab kings) यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज 12 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.
मुंबई : आयपीएल 2021 चा चौथा सामना सोमवारी राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यासह दोन्ही संघ आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) प्रवासाला सुरुवात करतील. केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने मागील मोसमात प्लेऑफमध्ये स्थान पक्कं करण्याचा भरपूर प्रयत्न केला होता मात्र त्यांना यश आलं नव्हतं आता यावेळी पहिल्या मॅचपासून धमाकेदार प्रदर्शन करुन प्रवासाची सुरुवात मोठ्या थाटात करण्याचा पंजाबचा मानस आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व उमदा खेळाडू संजू सॅमसन (Sanju Samson) करणार आहे. त्यामुळे त्यानेही काही खास प्लॅन आखले आहेत. आपल्या कर्णधारपदाच्या काळात आपल्या संघाला जेतेपद मिळवून द्यायचा त्याचा मानस आहे. (IPL 2021 RR vs PBKS live streaming When And Where To Watch online Free in Marathi)
पंजाब किंग्ज
या मोसमात पंजाब संघाने आपले नाव बदलले आहे. या हंगामात आता संघाची ओळख किंग्ज इलेव्हन पंजाब नसून पंजाब किंग्ज अशी असणार आहे. पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल मागील मोसमात शानदार फॉर्ममध्ये होता. या हंगामात त्याने युएईमध्ये ऑरेंज कॅप त्याच्या नावावर केली होती. मोहम्मद शमीच्या पुनरागमनामुळे संघ आणखी मजबूत झाला आहे. त्याच्यावरही महत्त्वाची जबाबदारी असेल. संघात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि ऑलराऊंडर म्हणून मोजेस हेनरिक्स आहे.
राजस्थान रॉयल्स
राजस्थानच्या संघासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सलामीच्या सामन्याबाहेर गेला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसला संघाने 16.25 कोटी रुपयांत विकत घेतले आहे, त्यामुळे तो संघासाठी महत्वाचा आहे.
गेल्या मोसमात राजस्थान आणि पंजाब यांच्यात दोन सामने खेळले गेले होते आणि दोन्ही सामने राजस्थानने जिंकले होते. पहिल्या सामन्यात राजस्थानने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला. यात राहुल तेवतियाने शेल्डन कॉटरलच्या एका षटकात 5 षटकार ठोकले होते. दुसरा सामना राजस्थानने सात विकेट्सने जिंकला.
सामना कधी आणि कुठे…?
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab kings) यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज 12 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.
सामना किती वाजता सुरु होणार?
भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.
लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab kings) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?
तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी+हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या बवेबसाईटला देखील पाहू शकता.
(IPL 2021 RR vs PBKS live streaming When And Where To Watch online Free in Marathi)
हे ही वाचा :
IPL 2021 : 2 वर्षानंतर मैदानात, केवळ 6 बॉल टाकले, वॉर्नरला चकवलं, तरीही हरभजनला फक्त एकच ओव्हर का?
IPL 2021 : धडाकेबाज अर्धशतकानंतर बोटातली रिंग दाखवली, नितीशच्या सेलिब्रेशनमागे हे खास कारण!