IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी डेव्हिड वॉर्नर उत्सुक, ऑरेंज आर्मी विजेतेपद पटकावणार?

सनरायजर्स हैदराबाद (sunrisers hyderabad) संघाचे आयपीएलच्या 13 व्या मोसमातील आव्हान 3 ऱ्या क्रमांकावर संपुष्टात आले होते.

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी डेव्हिड वॉर्नर उत्सुक, ऑरेंज आर्मी विजेतेपद पटकावणार?
डेव्हिड वॉर्नर
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 6:03 PM

मुंबई : आयपीएलचा 14 व्या मोसमासाठीचा लिलाव (Ipl Auction 2021) नुकताच पार पडला. यामध्ये विविध फ्रँचायजींनी अनेक खेळाडूंना कोट्यावधी खर्चून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. आता क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते या मोसमाचे. या मोसमाची तारीख अजूनही ठरलेली नाही. पण क्रिकेट चाहत्यांमध्ये आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी उत्साहाचं वातावरण आहे. खेळाडूंसोबत सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad Team) कर्णधार डेव्हिड वॉर्नरही (David Warner) या 14 व्या पर्वात खेळण्यासाठी सज्ज आहे. (ipl 2021 sunrisers hyderabad captain david warner excited for upcoming ipl season)

वॉर्नरने आपल्या इंस्टाग्रामवरुन हैदराबाद टीमचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आयपीएलच्या 13 व्या मोसमातील क्वालिफायर 2 सामन्यातील असल्याचं म्हटलं जात आहे. या फोटोमध्ये सर्वात पुढे वॉर्नर उत्साहात मैदानात जाताना दिसत आहे. तर इतर खेळाडूही पाहायला मिळत आहेत. हैदराबादचे सर्व चाहते, सपोर्ट स्टाफ आणि संघ सर्वच भारी आहेत. या मोसमासाठी मी सज्ज आणि उत्सुक असल्याचं वॉर्नरने म्हटलं आहे.

वॉर्नरच्या नेतृत्वात 2016 मध्ये विजेतेपद

हैदराबादला आतापर्यंत एकदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावण्यात यश आले होते. हैदराबादने 2016 मध्ये वॉर्नरच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. हैदराबादने गेल्या मोसमात टॉप 3 मध्ये एंट्री मारली होती. मात्र क्वालिफायर 2 सामन्यात दिल्लीकडून पराभव झाल्याने हैदराबादचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर संपला होता. हैदराबादने गेल्या मोसमात एकूण साखळी फेरीतील 14 सामन्यांमधून 7 सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे या मोसमात गत मोसमापेक्षा आणखी दमदार कामगिरी करण्याचा मानस हैदराबादचा असणार आहे.

मराठमोळ्या केदारच्या कामगिरीवर लक्ष

दरम्यान या मोसमात केदार जाधव संघासोबत जोडला गेला आहे. हैदराबादने केदारला 2 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. यामुळे केदार या मोसमात हैदराबादसाठी काय कामगिरी करतो, याकडे सर्व महाराष्ट्राचं आणि हैदराबादचं लक्ष असणार आहे.

यॉर्कर किंग थंगारासू नटराजन

थंगारासू नटराजन गेल्या वर्षी अनकॅप्ड खेळाडू होता. त्याने एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुच्या एबी डी व्हीलियर्सला यॉर्कर चेंडूवर बोल्ड केलं होतं. यासह त्याने संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. तेव्हापासून नटराजन यॉर्कर किंग म्हणून उदयास आला. तो या 13 व्या मोसमात सर्वाधिक यॉर्कर टाकणारा गोलंदाज ठरला. त्यानंतर नटराजनने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं. यामुळे या मोसमात नटराजन कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी Sunrisers Hyderabad चा संघ

डेव्हिड वॉर्नर, राशिद खान, मोहम्‍मद नबी, अभिषेक शर्मा, रिद्धिमान साहा, बासिल थंपी, जेसन होल्‍डर, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद, विराट सिंह, टी. नटराजन, अब्‍दुल समद, केन विलियमसन, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, जॉनी बेयरस्‍टो, मनीष पांडे, विजय शंकर, मिचेल मार्श, सिद्धार्थ कौल, प्रियम गर्ग, श्रीवत्‍स गोस्‍वामी, केदार जाधव, मुजीब उर रेहमान आणि जगदीश सुचिथ

संबंधित बातम्या :

IPL Sunrisers Hyderabad Team 2021 | मराठमोळा केदार जाधव हैदराबादकडून खेळणार, पाहा संपूर्ण टीम

IPL Auction 2021 Highlights | ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

(ipl 2021 sunrisers hyderabad captain david warner excited for upcoming ipl season)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.