Video: हवेत झेप घेत एका हातानंच कॅच टिपला! रायडूचे सुपर से भी उपर एफर्ट्स एकदा बघाच

इंडियन प्रीमिरय लीगच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात मंगळवारी अखेर चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) पहिल्या विजयाची प्रतीक्षा संपली. CSK ने RCB वर 23 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताने चेन्नईने 216 धावा केल्या होत्या. RCB ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 193 धावांपर्यंत मजल मारली.

Video: हवेत झेप घेत एका हातानंच कॅच टिपला! रायडूचे सुपर से भी उपर एफर्ट्स एकदा बघाच
Ambati Rayudu CatchImage Credit source: IIPL VIDEO SCREENSHOT
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 3:11 PM

मुंबई : इंडियन प्रीमिरय लीगच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात मंगळवारी अखेर चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) पहिल्या विजयाची प्रतीक्षा संपली. CSK ने RCB वर 23 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताने चेन्नईने 216 धावा केल्या होत्या. RCB ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 193 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे चेन्नईला आपला पहिला विजय मिळवता आला. चेन्नईने सगल चार पराभव पाहिल्यानंतर मंगळवारी त्यांना विजय मिळाला. आधी KKR, PBKS, LSG आणि SRH कडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिवम दुबे आणि रॉबिन उथाप्पा चेन्नईच्या यंदाच्या सीजनमधल्या पहिल्या विजयाचे हिरो ठरले. शिवम दुबेने (Shivam Dube) तुफान फटकेबाजी केली. त्याने 46 चेंडूत नाबाद 95 धावांची खेळी केली. यात पाच चौकार आणि आठ षटकार होते. तर रॉबिन उथाप्पा संकटमोचक ठरला. त्याने बिनधास्तपणे फटकेबाजी करत 50 चेंडूत 88 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि नऊ षटकार होते.

दुबे आणि उथप्पाव्यतिरिक्त चेन्नईच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. तसेच मधल्या फळीतला महत्त्वाचा फलंदाज अंबाती रायुडूला Ambati Rayudu) फलंदाजीची संधीच मिळाली नाही. फलंदाजीत संधी मिळाली नसली तरी रायुडूने क्षेत्ररक्षण करताना आपलं पूर्ण योगदान दिलं. अंबाती रायडूने टिपलेला एक झेलही या सामन्यानंतर चर्चेचा विषय ठरला.

रायुडूची फुल लेंग्थ डाइव्ह

अंबाती रायुडूने 16 व्या षटकात कर्णधार रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर आकाश दीपचा सर्वोत्तम झेल टिपला. रायुडूचा हा झेल इतका जबरदस्त होता की तो पाहून सगळेच जण आश्चर्यचकित झाले. शॉर्ट कव्हरवर उभ्या असलेल्या रायुडूने फुल लेंग्थ डाइव्ह मारत एका हाताने अप्रतिम झेल टिपला आणि आकाश दीपला माघारी धाडलं.

36 वर्षीय रायुडूचं अप्रतिम क्षेत्ररक्षण

चेन्नई सुपर किंग्जला डॅड आर्मी म्हटलं जातं. कारण त्याच्या संघात जुने आणि अधिक वय असलेले (30 हून अधिक वर्ष) खेळाडूंचा भरणा आहे. पण अंबाती रायुडूच्या क्षेत्ररक्षणाने वय फक्त एक आकडा आहे हे सिद्ध केले. रायुडूने ज्या प्रकारचा झेल टिपला. त्यासाठी उत्कृष्ट फिटनेस आवश्यक आहे. रायुडू 36 वर्षांचा आहे पण त्याची नजर आणि चेंडूवरची पकड खरोखरच अप्रतिम आहे.

इतर बातम्या

IPL 2022 Points Table: आयपीएलच्या गुणतालिकेत तुमचा संघ कुठे, तुमच्या आवडत्या संघाची आगेकुच की पिछेहाट?, जाणून घ्या

IPL 2022 MI vs PBKS Live Streaming: जाणून घ्या मुंबई विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, Orange Cap, Purple cap : 9 षटकार मारुन उथप्पाची आगेकुच, ऑरेंज कॅपच्या यादीत कोण आहे पुढे? पर्पल कॅपवर कुणाचं राज्य?

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.