IPL 2022 Auction : 5 T20 सामन्यात 230 धावा, 10 विकेट, अष्टपैलू बांगलादेशी खेळाडूवर पैशांचा पाऊस पडणार?
टाटा आयपीएल 2022 (Tata IPL 2022) चा लिलाव होणार आहे आणि लिलावाआधी (IPL 2022 Auction) एखाद्या खेळाडूने मोठा धमाका केला, इतिहास रचला, तर काय होईल याची कल्पना करा. अरे भाऊ, पैशाचा पाऊस पडेल आणि काय?
मुंबई : टाटा आयपीएल 2022 (Tata IPL 2022) चा लिलाव होणार आहे आणि लिलावाआधी (IPL 2022 Auction) एखाद्या खेळाडूने मोठा धमाका केला, इतिहास रचला, तर काय होईल याची कल्पना करा. अरे भाऊ, पैशाचा पाऊस पडेल आणि काय? असाच काहीसा प्रकार बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनसोबत (Shakib Al Hasan) घडणार आहे, ज्याने महा लिलावाच्या पूर्वसंध्येला इतिहास रचला आहे. त्याने सलग 5 टी-20 सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आता अशा मॅचविनर खेळाडूवर कोणती फ्रँचायझी किंवा संघ पैसा खर्च करणार नाही. आयपीएल 2022 च्या महा लिलावातही तेच होणार आहे.
शाकिब अल हसनची आयपीएल 2022 च्या महा लिलावात मूळ किंमत 2 कोटी रुपये असली तरी या अष्टपैलू खेळाडूला त्यापेक्षा जास्त किंमत मिळण्याची शक्यता आहे. शाकिब गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. पण सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्यामुळे त्याला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये रंजक स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
सलग 5 सामन्यांमध्ये सामनावीर
शकीब अल हसनने सलग 5 टी-20 सामन्यांमध्ये सामनावीर बनून इतिहास रचला आहे. पण हे आश्चर्य त्याने कसं केलं, आता तेही जाणून घ्या. गेल्या 5 सामन्यात त्याने 230 धावा केल्या आहेत. या 5 पैकी 3 सामन्यात त्याने झंझावाती अर्धशतकं झळकावली आहेत. फलंदाज म्हणून त्याने तुफानी खेळ केलाच सोबत त्याने गोलंदाजीतही कमाल केली आहे. मागील सलग 5 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 10 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये एका सामन्यात 23 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. म्हणजेच शाकिब त्याच्या अष्टपैलू खेळामुळे सामनावीर ठरला.
View this post on Instagram
शाकिब अल हसनची आयपीएलमधील कामगिरी
शाकिब अल हसनचे आयपीएलमधील रिपोर्ट कार्ड पाहिल्यास त्याने 71 सामन्यांमध्ये 52 डावांमध्ये 124.49 च्या स्ट्राईक रेटने 793 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच वेळी, त्याने 63 विकेट्सदेखील घेतल्या आहेत, ज्यामध्ये 17 धावांत 3 विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
इतर बातम्या
IPL 2022 auction: बोली पुकारताना चक्कर येऊन कोसळले ते ह्यू एडमीड्स कोण आहेत?