IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जची ताकद वाढली, स्टार खेळाडू पूर्णपणे फिट, संघात पुनरागमन
आयपीएल 2022 (IPL 2022) ही स्पर्धा 6 मार्चपासून सुरू होत आहे आणि पहिल्याच सामन्यात सध्याचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK 1st Match 26th March) पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. संघाचा पहिला सामना गत मोसमातील उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.
मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) ही स्पर्धा 6 मार्चपासून सुरू होत आहे आणि पहिल्याच सामन्यात सध्याचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK 1st Match 26th March) पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. संघाचा पहिला सामना गत मोसमातील उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. म्हणजेच 2021 च्या फायनलचा रिप्ले आपल्याला पाहायला मिळणार आहे. या पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या संघाला केवळ गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करायची नाही तर 2021 च्या संपूर्ण हंगामासारखी दमदार कामगिरी करायची आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी संघाला प्रत्येक सामन्यात प्रमुख खेळाडूंची गरज आहे आणि CSK ला या बाबतीत मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या मोसमात संघाचा सर्वात मोठा स्टार ठरलेला युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड फिट (Ruturaj Gaikwad Fit) होऊन परतला आहे. ऋतुराज पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे सीएसएकेचं बळ वाढलं आहे.
ऋतुराज गायकवाड गेल्या महिन्यात टीम इंडियासोबत होता, जिथे तो वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीमसोबत जोडला गेला होता. मात्र, दोन्ही वेळी तो वेगवेगळ्या कारणांमुळे खेळू शकला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती. या टी-20 मालिकेत त्याला एक सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाल्याने तो त्या मालिकेतून बाहेर पडला होता.
संघात सहभागी, प्लेईंग इलेव्हनमधील निवडीसाठी उपलब्ध
मनगटाच्या दुखापतीनंतर ऋतुराज राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून गेला. त्यात उशीर झाल्यामुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु आता तशी परिस्थिती नाही. स्पोर्ट्स वेबसाइट इनसाइड स्पोर्टने सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ऋतुराज आता पूर्णपणे फिट आहे आणि त्याने संघात सामील होऊन प्रशिक्षण सुरू केले आहे. विश्वनाथन यांनी सीएसकेच्या चाहत्यांना आणखी चांगली बातमी दिली आणि सांगितले की ऋतुराज पहिल्या सामन्यापासूनच संघातील निवडीसाठी उपलब्ध असेल. मात्र, मध्यमगती गोलंदाज दीपक चहर अजूनही फिट झालेला नाही.
गेल्या वर्षीचा ऑरेंज कॅप विजेता
महाराष्ट्राच्या या 25 वर्षीय प्रतिभावान खेळाडूने गेल्या मोसमात जबरदस्त कामगिरी केली होती. ऋतुराजने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज आणि सीएसकेचा माजी फलंदाज फाफ डू प्लेसिससोबत शानदार सलामीची भागीदारी रचली. दोघांनीही अनेक प्रसंगी संघाला दमदार सुरुवात करून सीएसकेच्या विजेतेपदाचा पाया रचला होता. ऋतुराजने गेल्या मोसमात 635 धावांसह ऑरेंज कॅप जिंकली, तर डु प्लेसिस 634 धावांसह दुसऱ्या स्थानावर होता.
इतर बातम्या