सगळ्यांची पर्स रिकामी करणाऱ्याची मुंबईनं जिरवली! पलटनने जे केलं त्याचा किस्सा भारीए

किरण कुमार गांधी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ऑक्शन करत होते. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी त्यांनी केलेली खेळी अनेकांना बुचकळ्यात पाडणारी ठरली. ऑक्शनच्या वेळी खेळाडूंची किंमत वाढवण्यात किरण कुमार गांधी यांनी मोलाची भूमिका बजावली.

सगळ्यांची पर्स रिकामी करणाऱ्याची मुंबईनं जिरवली! पलटनने जे केलं त्याचा किस्सा भारीए
Kiran Kumar Gandhi
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 12:11 PM

मुंबई : आयपीएलचं ऑक्शनवर सगळ्यांची नजर असते. पण जशी क्रिकेटच्या मैदानात (Strategy on Cricket Ground) रणनिती ठरवावी लागले, अगदी तशीच रणनिती ही आयपीएलच्या (Indian Premier League) संघात खेळांडूंची खरेदी करतानाही तयार ठेवावी लागते. कोटींची पर्स घेऊन खेळांडूंच्या लिलावावेळी कुणाला घ्यायचं, आपल्याला हवा तो खेळाडू कमी किंमतीत कसा मिळेल, यासाठी नेमकं काय करायचं, याचंही प्लानिंग करावं लागंत. हा विषय इतका प्रकर्षानं समोर येण्यामागचं कारण ठरलं, ते म्हणजे दिल्ली कॅपिटल्सच्या ऑक्शन टीममधील (IPL Auction 2022) एक इसम! दिल्लीच्या ऑक्शन टीममधला हा माणूस खेळाडूंची किंमत वाढावी, यासाठी लिलाव करत सुटला. पण जेव्हा खेळाडू घेण्याची वेळ यायची, तेव्हा मात्र हा माणूस चिडीचूप असायचा. शेवटी ज्यानं बोलीमध्ये पछाडलंय, त्याला नाईलाजानं जास्त पैसे मोजून खेळाडू खरेदी करावा लागत होता. हैदराबाद, पंजाब आणि मुंबईसोबत ऑक्शन करताना झालेली गंमत या माणसामुळे चांगलीच चर्चिली जातेय. त्याचे अनेक मीम्स तयार झालेत. पण अनेक फ्रेंचायझींच्या पर्स खाली करायला लावण्याऱ्या या माणसाला मुंबई इंडियन्सच्या मालकांनीदेखील चांगलाच धडा शिकवला.

किरण कुमार गांधी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ऑक्शन करत होते. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी त्यांनी केलेली खेळी अनेकांना बुचकळ्यात पाडणारी ठरली. ऑक्शनच्या वेळी खेळाडूंची किंमत वाढवण्यात किरण कुमार गांधी यांनी मोलाची भूमिका बजावली. किरण कुमार गांधी यांनी अनेक फ्रँचायझींना त्यांच्या आवडत्या खेळाडूसाठी अधिक रक्कम मोजायला भाग पाडले. कारण, गांधी बऱ्याचदा खेळाडूवर बोली लावायचे. मात्र त्या खेळाडूची किंमत खूप जास्त वाढल्यानंतर अचानक माघार घ्यायचे.

परंतु, किरण कुमार गांधींना मुंबई इंडियन्सच्या थिंक टँकने चांगलाच धडा शिकवला. लिलावाच्या वेळी डावखुरा जलदगती गोलंदाज खलील अहमदच्या नावाची घोषणा केल्यानंतर मुंबईने त्याच्यावर बोली लावली. त्यापाठोपाठ दिल्लीच्या किरण कुमार गांधींनी बोली लावली. खलीलची बेस प्राईस 50 लाख रुपये होती. दोन्ही फ्रँचायझींनी बोली लावत खलीलची किंमत 5 कोटींच्या पुढे नेली. मग मात्र मुंबईने माघार घेतली. अखेर 5.25 कोटी रुपयांच्या बोलीवर दिल्लीला खलील अहमदला खरेदी करावं लागलं. खलीलला त्याच्या बेस प्राईसच्या 10 पट अधिक पैसे मिळाले. तसेच खलीलला मागील लिलावात सनरायझर्स हैदराबादने 3 कोटी रुपयांत विकत घेतलं होतं. दिल्लीला यावेळी त्याच्यासाठी 75 टक्के अधिक रक्कम मोजावी लागली.

कोण आहे किरण कुमार गांधी

जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चरचे सीईओ, एमडी आणि संचालक म्हणून किरण कुमार गांधी ओळखले जातात. दिल्ली कॅपिटल्सच्या लिलावत ते नेहमीच दिसून आले आहेत. अलिकडच्या हंगावात एक चांगला संघ तयार करण्यासाठीच्या मॅनेजमेन्टचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून किरण कुमार गांधींकडे पाहिलं जातं. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मालकी हक्कांमध्येही किरण कुमार गांधींचाही वाटा आहे.

किरण कुमार गांधी एक बिझनेस मॅन आहेत. सध्या ते जीएमआर ग्रूपच्या सीईओंपैकी ते एक अध्यक्ष आहेत. तसंच जीएमआर एअरपोर्ट लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालकही आहेत. इतर संघाची पर्स वेळोवेळी खाली करण्यात किरण कुमार गांधी यांनी आयपीएलच्या 2022च्या लिलावात जे काम केलंय, त्याची चर्चा आता सगळीकडे सुरु झाली आहे.

इतर बातम्या

Happy Birthday Wasim Jaffer : दुसऱ्याच फर्स्ट क्लास सामन्यात त्रिशतक, 10 रणजी करंडक जिंकणाऱ्या क्रिकेटपटूचा आज वाढदिवस

IND vs SL: भारत-श्रीलंका मालिकेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर, विराट कोहली मोहालीत खेळणार 100वी कसोटी

हार्दिक पंड्याबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, कर्णधाराने सांगितलं T20 वर्ल्डकप टीममध्ये निवड कशी होणार?

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.