IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतरही चमकला ड्वेन ब्राव्हो, लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी
IPL 2022 : ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) लीगमधील आपल्या एका विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. ड्वेन ब्राव्होने कोलकाताचा फलंदाज सॅम बिलिंगची विकेट घेतल्यानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
IPL 2022 : वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामातील पहिल्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नईचा 6 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. जसे सामने होत आहेत, खेळाडू विक्रम मोडत आहेत. या सामन्यात ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) लीगमधील आपल्या एका विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. ड्वेन ब्राव्होने कोलकाताचा फलंदाज सॅम बिलिंगची विकेट घेतल्यानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता ड्वेन ब्राव्होला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ३१ मार्च रोजी होणाऱ्या पुढील सामन्यात मलिंगाला मागे टाकण्याची संधी असेल. ड्वेन ब्राव्होने कोलकाताविरुद्ध 4 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. सॅम बिलिंग्जने तिसरी विकेट घेताच ब्राव्होने मलिंगाच्या 170 बळींची बरोबरी केली.
मलिंगाच्या 170 बळींची बरोबरी
ड्वेन ब्राव्होच्या नावावर आता आयपीएलमधील 152 सामन्यांमध्ये 170 विकेट्स आहेत, तर मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने 122 सामन्यांमध्ये 170 विकेट घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज
लसिथ मलिंगा – 122 सामने, 170 विकेट्स ड्वेन ब्राव्हो – 152 सामने, 170 विकेट्स अमित मिश्रा – 154 सामने, 166 विकेट पियुष चावला – 165 सामने, 157 विकेट्स हरभजन सिंग – 163 सामने, 150 विकेट्स
तीन संघांसाठी लीगमध्ये घेतला भाग
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू पहिल्या सत्रापासून इंडियन प्रीमियर लीगचा भाग आहे. त्याने आतापर्यंत तीन संघांसाठी लीगमध्ये भाग घेतला आहे. तो या लीगमध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. ब्राव्होने 152 आयपीएल सामन्यांमध्ये 8.33 आणि 24च्या सरासरीने 170 विकेट्स घेतल्या आहेत, तर मलिंगाचा इकॉनॉमी रेट ब्राव्होपेक्षा (7.14) चांगला आहे, त्याने सरासरी (19) आणि कमी सामन्यांत (122) 170 बळी घेतले आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत, 7 भारतीय आणि 3 विदेशी गोलंदाजांचा टॉप 10 यादीत समावेश आहे.