IPL 2022 KKR vs CSK: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अशी असू शकते कोलकाता नाइट रायडर्सची Playing XI

| Updated on: Mar 26, 2022 | 7:47 AM

IPL 2022 KKR vs CSK: चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या लढतीने कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR vs CSK) संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15 व्या हंगामातील आपल्या अभियानाला सुरुवात करत आहे.

IPL 2022 KKR vs CSK: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अशी असू शकते कोलकाता नाइट रायडर्सची  Playing XI
KKR टीम
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या लढतीने कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR vs CSK) संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15 व्या हंगामातील आपल्या अभियानाला सुरुवात करत आहे. मागच्या सीजनच्या फायनलमध्ये हे दोन संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी धोनीच्या टीमने (Dhoni Team) विजय मिळवला होता. कोलकात्याचा संघ चेन्नई इतका यशस्वी नसला, तरी त्यांनी आयपीएलची दोन विजेतेपद मिळवली आहेत. केकेआरने यंदाच्या सीजनसाठी मुंबईकर श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. मागच्या महिन्यात पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये श्रेयसला आपल्या चमूत घेण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सने 12 कोटीपेक्षा जास्त रक्कम मोजली. कॅप्टनशिपचा विचार करुनच त्यांनी श्रेयसला विकत घेतलं. IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आपल्या बहुतांश खेळाडूंना परत विकत घेण्यात यशस्वी ठरला.

बॅकअपमध्ये चांगले खेळाडू

बॅकअप म्हणजे पर्यायी खेळाडू म्हणून ऑक्शनच्या शेवटी सुद्धा त्यांनी काही चांगले प्लेयर्स विकत घेतले आहेत. गत मोसमात यूएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी जोरदार कमबॅक केलं व थेट फायनलमध्ये धडक मारली. तोच फॉर्म या सीजनमध्येही कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

प्रमुख खेळाडू मुकणार

आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच केकेआर संघाला काही झटके बसले आहेत. इंग्लंडच्या एलेक्स हेल्सने बायोबबलच कारण देत स्पर्धेतून माघार घेतली. त्याच्याजागी एरॉन फिंचला घेण्यात आलं आहे. पण पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मालिका सुरु असल्यामुळे फिंच आणि पॅट कमिन्स पहिले पाच सामने उपलब्ध नसतील. त्यामुळे केकेआरला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आपल्या सर्वोत्तम खेळाडूंशिवाय खेळावे लागेल. चाचपणी करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत.

अशी असेल संभाव्य Playing XI

सलामीवीर – अजिंक्य रहाणे-वेंकटेश अय्यर
मधली फळी – नितीश राणा, श्रेयस अय्यर, सॅम बिलिंग्स,
ऑलराऊंडर – अँड्रे रसेल, शिवम मावी, सुनील नरेन,
गोलंदाज – टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

चेन्नई विरुद्ध केकेआर अशी असेल संभाव्य Playing XI

अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, सॅम बिलिंग्स, अँड्रे रसेल, शिवम मावी, सुनील नरेन, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती