IPL 2022 DC vs PBKS Live Streaming: जाणून घ्या दिल्ली विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये पाच सामने खेळले असून त्यापैकी दोन जिंकले आहेत, तर तीन सामन्यांमध्ये दिल्लीने पराभव पत्करले आहेत. शेवटच्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून पराभव पत्करावा लागला होता.

IPL 2022 DC vs PBKS Live Streaming: जाणून घ्या दिल्ली विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
Delhi CapitalsImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 8:00 AM

मुंबई : आयपीएल-2022 (IPL 2022) मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. हा स्पर्धेतला 32 वा सामना असेल. हा सामना कोरोनाच्या सावटाखाली आहे आणि त्यामुळे एक दिवस आधीच या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, यापूर्वी हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता, परंतु आता हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोरोना संसर्ग आणखी पसरू नये म्हणून बीसीसीआयने खबरदारी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या कॅम्पमध्ये आतापर्यंत पाच कोविड प्रकरणे आढळल्यानंतर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. सर्वात आधी दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यानंतर स्पोर्ट्स मसाज स्पेशलिस्ट चेतन कुमार यांना कोरोना झाला. 18 एप्रिलला दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच दिवशी टीम डॉक्टर अभिजीत साळवी यांचे कोव्हिड रिपोर्ट्सदेखील पॉझिटिव्ह आले. त्यानंतर संघाच्या सोशल मीडिया कंटेंट टीमचा सदस्य असलेला आकाश माने देखील कोव्हिड पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे दिल्लीचा संघ कोरोनाच्या भीतीखाली आहे. तरीदेखील दिल्ली कॅपिटल्सला कोविडची चिंता बाजूला सारून या सामन्यात चांगली कामगिरी करायची आहे आणि या हंगामातील तिसरा विजय त्यांच्या खात्यात टाकायचा आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये पाच सामने खेळले असून त्यापैकी दोन जिंकले आहेत, तर तीन सामन्यांमध्ये दिल्लीने पराभव पत्करले आहेत. शेवटच्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून पराभव पत्करावा लागला होता. पॉईंट्स टेबलवर हा संघ आठव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, पंजाबची कामगिरी तुलनेने बरी झाली आहे. या संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. हा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादने पंजाबचा पराभव केला होता.

दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 20 एप्रिल (बुधवार) रोजी खेळवला जाणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल. यापूर्वी या सामन्याचे आयोजन पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले होते.

दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पाहता येईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

इतर बातम्या

IPL 2022 Orange Cap : जॉस बटलर 272 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर,पर्पल कॅप युझवेंद्र चहलकडे कायम

RR vs KKR IPL Match Result: अरेरे, KKR चा निसटता पराभव, चहलची गेम चेंजिंग ओव्हर

RR vs KKR IPL 2022: दोघांनी मिळून घेतली एक कॅच, पहा बाउंड्रीवरील अफलातून झेल VIDEO, तुम्ही सुद्धा म्हणाल जबरदस्त

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.