IPL 2022, DC vs RR, Match Prediction : दमदार फलंदाजी, दुसरीकडे अप्रतिम फिरकी, दोन्ही संघाचे पारडे जड, आज दिल्ली आणि राजस्थानमधील लढत रोमांचक होणार

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचे दोन्ही संघ सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहे. दिल्लीच्या भक्कम फलंदाजीसमोर राजस्थानच्या फिरकीचे गोलंदाजांचे आव्हान असणार आहे. आजचा सामना रोमांचक असणार आहे.

IPL 2022, DC vs RR, Match Prediction : दमदार फलंदाजी, दुसरीकडे अप्रतिम फिरकी, दोन्ही संघाचे पारडे जड, आज दिल्ली आणि राजस्थानमधील लढत रोमांचक होणार
DC VS RRImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:08 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)  विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) सायंकाळा सात वाजता सामना होत आहे. दोन्ही संघांमध्ये बरोबरीची स्पर्धा आहे. राजस्थानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवला होता. दोन्ही संघांमधील स्पर्धा आतापर्यंत बरोबरीची राहिली आहे. दोघांनी 24 चकमकीत 12-12 असा विजय मिळवला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये दिल्लीचा वरचष्मा राहिला आहे. पण, राजस्थानचा संघ यावेळी खूपच संतुलित दिसतोय. अशा स्थितीत दिल्लीसाठी यावेळची आव्हाने पूर्वीपेक्षा काहीशी कठीण असतील इतकं मात्र नक्की. हा सामनाही पुण्यात होणार होता, मात्र दिल्ली कॅम्पमधील कोरोना प्रकरणामुळे मागील सामन्याप्रमाणेच तो मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचे विशेष लक्ष असणार आहे.

सामन्यात काय विशेष

या सामन्यात दोन्ही संघातील उपस्थित जादूगारांवर प्रामुख्याने नजर असेल. गेल्या सामन्यात हॅटट्रिक करणारा युझवेंद्र चहल या मोसमात 17 बळी घेऊन डोक्यावर जांभळ्या रंगाची टोपी घातला आहे. तर मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव 13 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या पाच वर्षात ‘कुल चा’ ने खूप चढ-उतार पाहिले आहेत. चहलला गेल्या टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आले होते. तर कुलदीपही खराब फॉर्ममुळे बाहेर होता. कुलदीप व्यतिरिक्त दिल्लीकडे अक्षर पटेल आणि ललित यादव देखील आहेत जे त्यांच्या फिरकीने विरोधी फलंदाजांना लगाम घालण्यात यशस्वी ठरत आहेत. हे तिघेही राजस्थानच्या फलंदाजांची धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करतील.

दोन्ही संघ फॉर्ममध्ये

फलंदाजीचा विचार केला तर दोन्ही संघांचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत . राजस्थानसाठी जोस बटलरने सर्वाधिक 375 धावा करून ऑरेंज कॅपवर बसला आहे. कर्णधार संजू सॅमसननेही चांगली कामगिरी केली आहे. तर शिमरॉन हेटमायरही गरजेच्या वेळी योगदान देत आहे. मात्र, या तिघांव्यतिरिक्त उर्वरित फलंदाजांची कामगिरी चिंताजनक आहे. बटलरचा सलामीचा जोडीदार देवदत्त पडिक्कलने गेल्या सामन्यात काही आकर्षक शॉट्स खेळले. त्यांना त्यात आणखी सुधारणा करायची आहे. या दोघांना सुरुवातीच्या षटकांमध्ये खलील अहमद, मुस्तफिझूर रहमान आणि शार्दुल ठाकूर यांच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. न्ही संघांमध्ये बरोबरीची स्पर्धा आहे. राजस्थानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवला होता. दोन्ही संघांमधील स्पर्धा आतापर्यंत बरोबरीची राहिली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

इतर बातम्या

Malegaon : मालेगावातल्या शासकीय कार्यालयामध्ये नो हेल्मेट नो एन्ट्री; सोमवारपासून धडाकेबाज कारवाई

No Bindi, No Business : टिकली नाही तर धंदा नाही, करीना कपूरची मलाबार गोल्डची जाहिरात वादात, हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप, ट्विटरवर ट्रेंड

Bachchu Kadu on Rana : ‘निवडणुकीवेळी तुमचा बाप वेगळा होता आता तो बदलला’, बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर जहरी टीका

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.