IPL 2022 : विजयाच्या शोधातील संघ आमने-सामने, मोईनमुळे सीएसकेला बळ, आयुषकडेही असणार लक्ष?
आजचा सामना विजयाच्या शोधात असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. एलएसजी आणि सीएसके या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलाय. आता आयपीएलच्या या सातव्या सामन्यात कुणाला विजयश्री खेचून आणता येतो, लखनऊचा संघ जडेजाला रोखणार की केएल राहुल बाजी मारणार बाजी?, हे आज संध्याकाळी सात वाजताच कळेल.
मुंबई : आजचा सामना विजयाच्या शोधात असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. एलएसजी (LSG) आणि सीएसके (CSK) या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलाय. लखनऊ सुपर जायंट्सला पहिल्या सान्यात गुजरातविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर दुसरीकडे चेन्नईला कोलकात्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता आयपीएलच्या (IPL 2022) या सातव्या सामन्यात कुणाला विजयश्री खेचून आणता येतो, लखनऊचा संघ जडेजाला रोखणार की केएल राहुल बाजी मारणार बाजी?, हे आज संध्याकाळी सात वाजताच कळेल. चेन्नईचा संघ हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. लखनऊचा संघ प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाला असला तरी लखनऊच्या खेळाडूंनाही आयपीएलचा भरपूर अनुभव आहे. विशेष म्हणजे या संघातील सर्व मोठे खेळाडू जुन्या आयपीएल संघांचा भाग राहिले आहेत. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार, असंच चहुकडे बोललं जातंय.
मोईनमुळे सीएसकेला बळ
पहिल्या सामन्यात चेन्नईला फक्त 131 धावा काढता आल्या. सीएसकेला आता चांगली फलंदाजी करण्याची गरज आहे. मोईन अलीच्या पुनरागमनामुळे संघ मजबूत झाला आहे. तर ड्वेन प्रिटोरियस हा निवडीसाठी उपलब्ध असेल. पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं आपली झलक दाखवली पण ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे आणि अंबाती रायुडू खेळले नाहीत. त्यामुळे आज या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
युनिटी दाखवावी लागेल
कर्णधार रवींद्र जडेजा हा देखील मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करेल. पण मोईनच्या जागी कोण खेळणार आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या यापूर्वी झालेल्या सामन्यात अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने तीन बळी घेतले होते. पण इतर चांगली गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांनाही एक युनिट म्हणून कामगिरी करावी लागेल.
आयुषकडे असणार लक्ष
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात एका 22 वर्षाच्या मुलाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव आहे आयुष बडोनी. आयुषने बॅटचा चांगलाच हिसका दाखवला. आयपीएलमध्ये त्याने लखनऊ संघाकडून डेब्यू केला. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने चमकदार खेळ दाखवला. समोर राशिद खान, हार्दिक, पंड्या, मोहम्मद शमी सारखे गोलंदाज होते. पण त्यांचा सामना करताना तो डगमगला नाही. उलट त्यांच्या गोलंदाजीवर तो तुटून पडला. लखनौचा डाव अडचणीत सापडला होता. 29 धावात चार विकेट गेल्या होत्या. त्यावेळी त्याने अनुभवी दीपक हुड्डा सोबत मिळून पाचव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली व लखनौला संकटातून बाहेर काढलं. त्यामुळे आजच्या सामन्यात आयुषकडेही लक्ष असणार आहे.
इतर बातम्या
भरत जाधव-निवेदिता सराफ यांचा ‘कम्फर्ट नात्यांचा’, यशोमान, मयुरी आणि सुयशचं अफलातून समीकरण
तुम्ही खाद्यपदार्थ वाया तर घालवत नाही ना? ‘हा’ Viral video पाहा, काय दिला संदेश?