मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील आज गुजरात टायटन्स (GT) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये (RCB) सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या बेब्रोन स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास गुजरात टायटन्स हा संघ पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहे. त्यापैकी गुजरातच्या संघाला सर्वाधिक 7 सामन्यात यश आलंय. तर फक्त एक सामना त्यांनी गमावलाय. गुजरात संघाचा नेट रेट 0.371 आहे. त्यांनी आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये सर्वाधिक 14 पॉईंट्स मिळवले आहेत. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी असून या संघाने आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी बंगळुरूच्या संघाला 5 सामन्यात यश आलंय तर 4 सामन्यात त्यांना पराजयाचा सामना करावा लागलाय. बंगळुरूचा नेट रेट -0.572 आहे तर या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये 10 पॉईंट्स मिळाले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात हे दोन्ही संघ कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.
आरसीबी संघाला त्यांच्या फलंदाजीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. विराट कोहलीच्या खराब फलंदाजीचा मोठा फटका या संघाला बसला आहे. जरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी असले तरी या संघाकडून आणखी चांगली कामगिरी अपेक्षित आहे. आज पुन्हा एकदा विराटची खराब कामगिरी आणि त्याविषयीच्या चर्चा होतील. त्यामुळे चांगली कामगिरी करण्याचा त्याच्यावर दबाव असणार आहे. विराट ज्या प्रकारे खेळतो आहे. यामुळे त्याचा फटका आरसीबीला बसत असल्याचंही बोललं जातंय. कोहलीने या सीजनमध्ये आरसीबीसाठी 9 सामन्यात फक्त 128 धावा केल्या आहेत.
गुजरात टायटन्स सध्या चांगलाच जोमात आहे. या संघाने आयपीएलच्या पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास हा संघ पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहे. त्यापैकी गुजरातच्या संघाला सर्वाधिक 7 सामन्यात यश आलंय. तर फक्त एक सामना त्यांनी गमावलाय. गुजरात संघाचा नेट रेट 0.371 आहे. त्यांनी आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये सर्वाधिक 14 पॉईंट्स मिळवले आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या कामगिरीचं उत्कृष्ट प्रदर्शन केलंय. गुजरातने दाखवून दिलंय आहे की पहिली फळी अपयशी ठरली तरी दुसऱ्या फळीकडून आपल्याला कसं काम करून घ्यायचंय. पांड्याने सात सामन्यात संघासाठी 305 धावा करून सर्वाधिक धावसंख्या केली आहे. शुभमन गिल, डेव्हिड मिलर आणि रिद्धिमान साहा यांच्या बरोबरीनं तो पुन्हा एकदा धावा काढणारा अव्वल खेळाडू असण्याची शक्यता आहे.