IPL 2022 च्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाज पहिल्या सामन्यात खेळणार नाही

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयपीएल 2022 (IPL 2022) च्या पहिल्या सामन्यात आपल्या संघासोबत नसेल. मुंबई इंडियन्सला 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

IPL 2022 च्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाज पहिल्या सामन्यात खेळणार नाही
Suryakumar yadav Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 9:15 AM

मुंबई : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयपीएल 2022 (IPL 2022) च्या पहिल्या सामन्यात आपल्या संघासोबत नसेल. मुंबई इंडियन्सला 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे, मात्र संघाचा हा स्फोटक फलंदाज पहिल्या सामन्यात सहभागी होणार नाही. आयपीएलपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या टी-20 मालिकेदरम्यान सूर्यकुमारला दुखापत झाली होती. सूर्यकुमारच्या या दुखापतीने आता मुंबई इंडियन्सच्या चिंता वाढवल्या आहेत.

सूर्यकुमारच्या अंगठ्याला दुखापत झाल्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसनाच्या प्रक्रियेतून गेला. मुंबई इंडियन्सने यंदा त्यांच्या चार जुन्या खेळाडूंना संघात कायम ठेवले असून या चार खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादवदेखील आहे. त्याच्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांनादेखील संघात कायम ठेवण्यात आले आहे.

सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून पहिला सामना खेळणार नाही

मुंबईच्या संघात सूर्यकुमार यादवला महत्त्वाचे स्थान आहे. विशेषत: गेल्या दोन हंगामांपासून सूर्यकुमारने संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो अनेक वेळा मॅचविनर असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. अशा स्थितीत त्याच्या संघातील अनुपस्थितीमुळे मुंबईवर नक्कीच दडपण येईल. गेल्या मोसमात मुंबईचा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नव्हता, त्यामुळे यंदाचा प्रत्येक सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीचा अर्थ असाही आहे की रोहित शर्मा आणि इशान किशन किशन यांच्याशिवाय एकही आंतरराष्ट्रीय भारतीय फलंदाज संघात असणार नाही. सूर्यकुमारच्या जागी रमणदीप सिंग आणि अनमोलप्रीत सिंगला संघात संधी मिळू शकते. दुसरीकडे हैदराबादचा अनकॅप्ड खेळाडू तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो.

2019 मध्ये सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघात दाखल झाला. तेव्हापासून तो संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. सूर्यकुमारने आयपीएलमध्ये मुंबईसाठी दाखवलेल्या खेळाच्या जोरावर त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. मुंबईच्या गेल्या फ्लॉप हंगामातही तो चमकला आणि 22 च्या सरासरीने 317 धावा केल्या. तो त्याच्या हिटिंगसाठी ओळखला जातो, जो मैदानावर येताच अटॅक करायचा.

सूर्यकुमारचं रिहॅबिलिटेशन

वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेत सूर्यकुमार चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. काही दिवसांपूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले होते, “सूर्याचे सध्या एनसीएमध्ये पुनर्वसन सुरू आहे. तो फिट होत आहे पण पहिल्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे.”

इतर बातम्या

IPL 2022 मध्ये कॉमेंटेटर्स होणार मालामाल, हर्षा भोगले ते सुनील गावस्कर जाणून घ्या दिग्गजांची ‘फी’

IPL 2022 ला चार दिवस उरलेले असताना Delhi Capitals साठी मोठी गुड न्यूज, हुकूमी एक्का 7 एप्रिलला करणार कमबॅक

Womens World Cup 2022 IND vs BAN: भारताने बांग्लादेशला चिरडलं, जाणून घ्या विजयाची 5 कारणं

Non Stop LIVE Update
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्टरी
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्टरी.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.