Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Orange Cap: इशान किशनने संधी गमावली, नंबर एकची खुर्ची जॉस बटलरकडेच!

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतशी ऑरेंज कॅपसाठीची (IPL Orange Cap) चढाओढ खूपच मनोरंजक होत आहे. शनिवारी झालेल्या डबल हेडर सामन्यानंतर या यादीतही बराच बदल झाला आहे.

IPL 2022 Orange Cap: इशान किशनने संधी गमावली, नंबर एकची खुर्ची जॉस बटलरकडेच!
Ishan Kishan Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 10:40 AM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतशी ऑरेंज कॅपसाठीची (IPL Orange Cap) चढाओढ खूपच मनोरंजक होत आहे. शनिवारी झालेल्या डबल हेडर सामन्यानंतर या यादीतही बराच बदल झाला आहे. दिवसाच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने 75 धावांची शानदार खेळी केली. दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईचा पराभव केला, त्यात बंगळुरूचा युवा सलामीवीर अनुज रावतनेही 66 धावांची उत्कृष्ट खेळी केली. शनिवारी झालेल्या दोन्ही सामन्यांनंतरही राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरच्या (Jos Buttler) डोक्यावरील ऑरेंज कॅप कायम आहे. लखनौ सुपर जायंट्सचा युवा स्टार शुभमन गिल त्याला आव्हान देत देत आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत 18 सामने खेळवण्यात आले आहेत. यावेळी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा दीपक हुडा, गुजरात टायटन्सचा शुभमन गिल आणि मुंबईचा इशान किशन यांसारखे युवा स्टार्स जॉस बटलर, फाफ डू प्लेसिस आणि केएल राहुल यांना कडवी टक्कर देत आहेत. मात्र शनिवारच्या डबल हेडर सामन्यानंतरही कोणत्याही फलंदाजाला बटलरला मागे टाकता आलेले नाही, मात्र हे अंतर आता कमी होत आहे.

इशान किशनने संधी गमावली

दिवसाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात अभिषेक शर्माशिवाय एकाही फलंदाजाने मोठी खेळी केली नाही, त्यामुळे ऑरेंज कॅपच्या पहिल्या पाचमध्ये कोणताही बदल झाला नाही. मुंबईचा फलंदाज इशान किशनला बटलरला मागे टाकण्याची किंवा त्याच्या जवळ जाण्याची संधी होती. मात्र तो तसे करू शकला नाही. या सामन्यात मुंबईच्या इशानने केवळ 26 धावा केल्या. त्याच्या आता 4 डावात 175 धावा झाल्या असून तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तीन सामन्यांत 205 धावा करणारा बटलर अजूनही अव्वल स्थानावर आहे, तर शुभमन गिल 180 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

ऑरेंज कॅप कोणाला दिली जाते?

ऑरेंज कॅप हे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असते. संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला प्रत्येक हंगामाच्या शेवटी ही कॅप आणि बक्षीस दिलं जातं. तसेच प्रत्येक सामन्यानंतर, त्या वेळी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल असलेल्या खेळाडूच्या डोक्यावर ही कॅप दिसते. गेल्या वर्षी ही कॅप चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडच्या डोक्यावर होती, मात्र यंदा तो खराब फॉर्मशी झुंजत आहे.

इतर बातम्या

RCB vs MI, IPL 2022 : सूर्यकुमारने एकट्याने RCBला शांत केलं, अर्धशतक ठोकले

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मैदानात उतरताच केला मोठा विक्रम, धोनी आणि रैनाच्या यादीत समावेश

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....