IPL 2022, KKR vs RR, Live Streaming : आज कोलकाता विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल सामना?
आयपीएल पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास राजस्थान रॉयल्स हा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये 8व्या क्रमांकावर आहे.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज कोलकाता नाईट राडयर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिमवर खेळवला जाणार असून संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होणार आहे. त्यापूर्वी 7 वाजता दोन्ही संघामध्ये टॉस होईल. आयपीएल पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास राजस्थान रॉयल्स हा संघ दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थानचा संघ आतापर्यंत 9 सामने खेळला असून त्यापैकी 6 सामन्यात राजस्थानला विजय मिळालाय. तर उर्वरीत 3 सामन्यात त्यांना अपयशाचा सामना करावा लागलाय. राजस्थानला पॉईंट्स टेबलमध्ये 12 पॉईट्स मिळाले आहेत. तर नेट रेट 0.450 आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये 8व्या क्रमांकावर आहे. कोलकाताने एकूण 9 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 3 सामन्यात यश आलंय तर 6 सामन्यात कोलकाताला अपयशाचा सामना करावा लागलाय. कोलकाता नाईट रायडर्सचा नेट रेट -0.006 आहे. तर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाताला एकूण 6 पॉईंट्स मिळाले आहेत.
कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?
कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना आज 2 मे (सोमवार) रोजी खेळवला जाणार आहे.
कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?
कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.
कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?
कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी सात वाजता होईल.
कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?
कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.
कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?
कोलकाता नाईट राडयर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.