IPL 2022, MI vs LSG, KL rahul : केएल राहुलने इतिहास रचला, सचिन, सेहवागला टाकलं मागे, राहुलने असं काय केलं?

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आजच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यात 60 बॉलमधे सर्वाधिक 103 धावा केएल राहुलने काढल्या. यामध्ये त्याने तब्बल 9 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे राहुलने आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकर, सेहवागलाही मागे टाकलंय. वाचा राहुलने असं काय केलंय.

IPL 2022, MI vs LSG, KL rahul :  केएल राहुलने इतिहास रचला, सचिन, सेहवागला टाकलं मागे, राहुलने असं काय केलं?
KL RahulImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 6:56 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आजच्या मुंबई इंडियन्स ( MI )विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) सामना सुरु आहे. यामध्ये 60 बॉलमधे सर्वाधिक 103 धावा केएल राहुलने काढल्या. यामध्ये त्याने तब्बल 9 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे राहुलने आजच्या सामन्यात शतक पूर्ण केलंय.  राहुलने आयपीएलमधील 100 वा सामना संस्मरणीय बनवला आहे. 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा राहुल हा पहिला फलंदाज आहे. त्याने आयपीएलच्या 15 व्या सीजनमधील दुसरे शतक झळकावलं. त्याच्या आधी जोस बटलरनेही मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते. IPL 2022 च्या 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौच्या संघाने स्फोटक फलंदाजी केली. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने आयपीएलमधील तिसरे शतक झळकावले आहे.

राहुलचे अनेक विक्रम

60 बॉलमधे सर्वाधिक 103 धावा केएल राहुलने काढल्या. यामध्ये त्याने तब्बल 9 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे राहुलने आजच्या सामन्यात आयपीएलमधलं तिसरं शतक पूर्ण केलंय. राहुलनंतर सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला मनीष पांडे. याने 29 बॉलमध्ये 38 धावा काढल्या. यापैकी सहा चैकार मनीष पांडेनं मारले. यानंतर डी कॉकने 24 धावा तेरा बॉलमध्ये काढल्या. यात एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. दीपक हुड्डाने 8 बॉलमध्ये 15 धावा काढल्या. यामध्ये दीपकने एक चौकार आणि एक षटकार मारला. तर स्टॉईनसने नऊ बॉलमध्ये दहा धावा काढल्या. त्यात त्याने एक षटकार मारला आहे. क्रुणाल पंड्याने एक बॉलमध्ये एक रन काढला. अशा प्रकारे लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 199 धावा काढल्या असून लखनौने मुंबई इंडियन्सला 200 धावांचं टार्गेट दिलं.

राहुलचे विक्रमांवर विक्रम

  1. राहुलने आयपीएलमधील 100 वा सामना ऐतिरहासिक ठरवला. 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा राहुल हा पहिला फलंदाज आहे.
  2. याआधी 100 व्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम फाफ डू प्लेसिसच्या नावावर होता. त्याने 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 86 धावा केल्या होत्या.
  3. कर्णधार म्हणून दोन किंवा अधिक शतके करणारा राहुल दुसरा खेळाडू ठरला.
  4. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने कर्णधार म्हणून पाच शतके झळकावली आहेत.
  5. सचिन तेंडुलकर, अॅडम गिलख्रिस्ट, वीरेंद्र सेहवाग आणि संजू सॅमसन यांची कर्णधार म्हणून प्रत्येकी एक शतक आहे.
  6. राहुलने मुंबईविरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले.
  7. यापूर्वी, 10 एप्रिल 2019 रोजी वानखेडे स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाबसाठी 64 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या होत्या. त्याचा संघ तो सामना हरला.
  8. 24 सप्टेंबर 2020 रोजी, त्याने दुबईमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध 69 चेंडूत नाबाद 132 धावा केल्या. त्यानंतर पंजाबला विजय मिळाला.

इतर बातम्या

cotton candy floss sugar च्या उर्फीच्या ड्रेसवर सोशल मीडिया युझर्स म्हणाले …

Alia Ranbir Kapoor Wedding : कोण आहे सुनील तळेकर आणि युसूफ इब्राहीम, ज्यांनी सुरक्षेची जबाबदारी सांभाळली?

IPL 2022, MI vs LSG : लखनौकडून मुंबई इंडियन्सला 200 धावांचे लक्ष्य, इंडियन्स लक्ष्य पूर्ण करणार?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.