IPL 2022: ‘या’ परदेशी खेळाडूंनी आयपीएल संघांना दिला धोका, वेळेवर खेळण्यासाठी उपलब्ध नसणार

| Updated on: Mar 15, 2022 | 6:54 PM

IPL 2022: आयपीएलची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे. नव्या पद्धतीने यावेळी सामने खेळले जाणार आहेत. आठ नाही, दहा संघ यावेळी आयपीएलमध्ये आहेत.

1 / 10
आयपीएलची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे. नव्या पद्धतीने यावेळी सामने खेळले जाणार आहेत. आठ नाही, दहा संघ यावेळी आयपीएलमध्ये आहेत. 10 टीम्सची दोन ग्रुप्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. फेब्रुवारीत मेगा ऑक्शनमध्ये काही खेळाडू विकत घेतले होते. पण काही खेळाडुंनी दुखापती व अन्य कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊया. (IPL Photo)

2 / 10
चेन्नई सुपर किंग्सने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ड्वायन प्रीटोरियसला 50 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. पण पहिल्या सामन्यात तो खेळणार नाही. कारण बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी दक्षिण आफ्रिकन संघात त्याची निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने अजून कसोटी संघाची घोषणा केलेली नाही. त्याची निवड झाली, तर आयपीएलच्या आणखी सामन्यांना तो मुकू शकतो.

3 / 10
मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला विकत घेतलं आहे. पण दुखापतीमुळे तो या सीजनमध्ये खेळणार नाही.

4 / 10
पॅट कमिन्स आणि एरॉन फिंच सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार नाहीत. फिंचची पाकिस्तान विरुद्धच्या  वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कॅप्टन पॅट कमिन्स पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर केकेआरकडून खेळेल.

5 / 10
वान डर डुसैची बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी दक्षिण आफ्रिकन संघात निवड झाली आहे. त्यामुळे त्याला सुरुवातीचे काही सामने राजस्थान रॉयल्सकडून खेळता येणार नाहीत. कसोटी संघात निवड झाली, तर आणखी काही सामन्यांनाही मुकावे लागेल.

6 / 10
ऑस्ट्रेलियाचा सीन एबॉट, दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅनसेन आणि एडन मार्कराम सुरुवातीचे काही सामने सनरायजर्स हैदराबादकडून खेळणार नाहीत. जॅनसेन-मार्करामची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी तर एबॉटची पाकविरुद्धच्या वनडेसीरीजसाठी संघात निवड झाली आहे.

7 / 10
दिल्ली कॅपिटल्सलाही ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका-बांगलादेश सीरीजमुळे नुकसान होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, दक्षिण आफ्रिकेची लुंगी निगीडी, बांग्लादेशचा मुस्ताफिजुर रहमान सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. एनरिक नॉर्खियाही दुखापतीमधून सावरलेला नाही.

8 / 10
इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो, ऑस्ट्रेलियाचा नॅथन इलिस आणि दक्षिण आफ्रिकेच्या रबाडा सुरुवातीचे काही सामने पंजाब किंग्सकडून खेळू शकणार नाही. इंग्लंडची वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. रबाडा बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरीजमुळे खेळू शकणार नाही .

9 / 10
इंग्लंडचा मार्क वुड, वेस्ट इंडिजचा काइल मायेर्स, जेसन होल्डर, ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टोयनिस आणि दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डि कॉक सुरुवातीच्या चार ते पाच सामन्यांना मुकू शकतात. लखनौ सुपर जायंट्सला याचा फटका बसणार आहे.

10 / 10
ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू जेसन बहरनडॉर्फ, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड आयपीएल सामन्यांना मुकणार आहेत. याचा फटका रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला बसेल.