IPL 2022, LSG vs GT, Live Streaming :आज गुजरात विरुद्ध लखनै सामना, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल सामना?

मुंबईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात गुजरातसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शुभमन गिलने अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतलाय.

IPL 2022, LSG vs GT, Live Streaming :आज गुजरात विरुद्ध लखनै सामना, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल सामना?
LSG vs GT आज सामनाImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 10:20 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजन सीजनमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) या दोन्ही संघाचा सामना होणार आहे. लखनौचा संघ शेवटच्या चार सामन्यात विजय मिळवत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आणखी आत्मविश्वास आलाय. या दोन्ही संघांमधील हा या मोसमातील दुसरा सामना आहे. यापूर्वी 28 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरया दोन्ही संघांचा सामना झाला होता. ज्यामध्ये गुजरातने विजय मिळवला होता. तो सामना देखील दोन्ही संघांचा आयपीएलमधील पहिला सामना होता. आता लखनौ त्या पराभवाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात गुजरातला विजयी ट्रॅकवर परतणं गरजेचं आहे. मुंबईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात गुजरातसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शुभमन गिलने अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतलाय. त्याचा साथीदार रिद्धिमा साहानेही अर्धशतक ठोकले होते.

लखनौ सध्या फॉर्ममध्ये

लखनौने त्यांच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यांनी कोलकाचा पराभव केला होता. गुजरातसारख्या बलाढ्य संघासमोर लखनौ सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे. तोच फॉर्म सुरू ठेवावा लागेल. गेल्या सामन्यात क्विंटन डी कॉकने अर्धशतक झळकावले आणि दीपक हुडानेरही रंग दाखवला होता. आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर यांनीही या मोसमात बॅटने प्रभाव पाडला आहे. रवी बिश्नोईला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नसली तरी राहुल त्याच्यावर विश्वास ठेवेल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना आज 10 मे  (मंगळवार) रोजी खेळवला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असेसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना संध्याकाळी  साडेसात वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी सात वाजता होईल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.