IPL 2022: ‘विभीषणा’ने सनरायझर्स हैदराबादला हरवलं! एका षटकात सामना आणि कर्णधाराचा विश्वास जिंकला

हिंदी भाषेत एक म्हण आहे, 'घर का भेदी लंका ढाए'. लखनौ सुपर जायंट्सकडून झालेल्या पराभवात ही म्हण सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) अगदी तंतोतंत बसते. कारण या सामन्यात अशा खेळाडूने सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली, जो पूर्वी हैदराबादसाठी जीवाचं रान करुन खेळायचा.

IPL 2022: 'विभीषणा'ने सनरायझर्स हैदराबादला हरवलं! एका षटकात सामना आणि कर्णधाराचा विश्वास जिंकला
IPL 2022, Jason Holder Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 10:21 AM

मुंबई : हिंदी भाषेत एक म्हण आहे, ‘घर का भेदी लंका ढाए’. लखनौ सुपर जायंट्सकडून झालेल्या पराभवात ही म्हण सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) अगदी तंतोतंत बसते. कारण या सामन्यात अशा खेळाडूने सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली, जो पूर्वी हैदराबादसाठी जीवाचं रान करुन खेळायचा. गेल्या हंगामापर्यंत हैदराबादसाठी खेळत होता. आम्ही जेसन होल्डरबद्दल (Jason Holder) बोलत आहोत. सोमवारी झालेल्या सामन्यात जलदगती गोलंदाज आवेश खानला (Avesh Khan) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले असले तरी लखनौला विजयाचा नवाब बनवण्यात होल्डरचंदेखील मोठं योगदान आहे. क्वारंटीन कालावधी पूर्ण करुन संघात परतलेला जेसन होल्डर पहिलाच सामना खेळत होता. असं असूनही तो मॅचविनिंग कामगिरी करु शकला कारण तो पूर्वी हैदराबदकडून खेळायचा.

लखनौविरुद्ध सोमवारी झालेल्या पराभवाने IPL 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे गुणांचे खाते अद्याप उघडले नाही. सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एका रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला. या सामन्यात जेसन होल्डरने संपूर्ण 4 षटके गोलंदाजी केली. मात्र संघाच्या विजयाबरोबरच त्याचे एक षटक कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पुरेसे ठरले.

कर्णधाराचा विश्वास जिंकला

सनरायझर्सला पराभवाच्या गर्तेत ढकलणाऱ्या जेसन होल्डरचे ते एक त्याच्या कोट्यातलं आणि लखनौच्या डावातलं शेवटचं षटक होतं. याच षटकात सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या 6 चेंडूत विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या आणि त्यांच्या 4 विकेट शिल्लक होत्या. अशा स्थितीत तोच गोलंदाज समोरच्या संघाला इतक्या धावा करण्यापासून रोखू शकतो, ज्याला सनरायझर्सच्या खेळाची पद्धत, त्यांच्या खेळाडूंच्या गुण आणि दोषांची चांगलीच कल्पना असेल. अशा वेळी जेसन होल्डरपेक्षा दुसरा चांगला चांगला पर्याय असू शकत नाही. त्यामुळे कर्णधार केएल राहुलने होल्डरकडे चेंडू सोपवला.

3 षटके, 31 धावा, 0 विकेट्स ते 4 षटकं, 34 धावा, 3 विकेट्स

होल्डरने सामन्यात 3 षटके टाकली होती आणि त्यात त्याने एकही विकेट न घेता 31 धावा दिल्या होत्या. असे असूनही तो कर्णधाराच्या भरवशावर खरा उतरला. त्याला ज्यासाठी चेंडू देण्यात आला होता ते काम त्याने नीट केलं. त्यामुळे होल्डरची रिकामी असलेली विकेट्सची झोळीदेखील भरली आणि लखनौच्या संघाला स्पर्धेतील दुसरा विजय मिळाला.

6 चेंडूत 3 धावा देत 3 विकेट

शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन होल्डरने वॉशिंग्टन सुंदरची विकेट घेतली. आता एसआरएचसमोर 5 चेंडूत 16 धावा करण्याचे आव्हान होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दोन एकेरी धावा आल्या. आता 3 चेंडूत 14 धावांचे आव्हान होते. चौथ्या चेंडूवर होल्डरने आणखी एक विकेट घेतली. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकेरी धाव दिली आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एक विकेट मिळाली.

इतर बातम्या

LSG vs SRH KL Rahul: कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर केएल राहुलची ‘सुपरमॅन’ कॅच

LSG vs SRH IPL Match Result: विजयासाठी 18 चेंडूत 33 धावा, स्ट्राइकवर होता धोकादायक पूरन, गंभीर आवेशला एवढचं म्हणाला ‘तू तुझा…’

IPL 2022 points table : लखनौची आगेकुच, हैदराबाद मात्र निराश, IPLमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.