IPL 2022 MI vs LSG Live Streaming: जाणून घ्या लखनौ विरुद्ध मुंबई सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शनिवार हा डबल हेडरचा दिवस आहे. एकाच दिवसात दोन सामने पाहण्याचा आनंद क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. दिवसाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे,
मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शनिवार हा डबल हेडरचा दिवस आहे. एकाच दिवसात दोन सामने पाहण्याचा आनंद क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. दिवसाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे, तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर भिडणार आहेत. यापैकी मुंबई विरुद्ध लखनौ हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी लखनौपेक्षा जास्त महत्त्वाचा असणार आहे कारण हा संघ आता खूप पिछाडीवर आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईची लोकल ट्रॅकवरुन घसरली आहे. ती ट्रॅकवर आणण्यासाठी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) शानदार खेळ करावा लागेल. सोबत त्यांना गोलंदाजांची साथदेखील मिळायला हवी. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सला आपले स्थान बळकट करण्यासाठी जिंकायचे आहे.
लीगच्या 15 व्या मोसमातील मुंबई इंडियन्सचा हा सहावा सामना असेल. याआधी झालेल्या पाचही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेच्या तळाशी आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सचा संघही सहावा सामना खेळणार आहे. त्यांनी यापूर्वी खेळलेल्या 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. सध्या लखनौचे गुणतालिकेत पाचवे स्थान आहे. पण, त्यांनी मुंबईला हरवल्यास हा संघ पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानी झेप घेईल.
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 16 एप्रिल (शनिवार) रोजी खेळवला जाणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 3 वाजता होईल.
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पाहता येईल?
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता
इतर बातम्या
Purple Cap 2022 : पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे, जाणून घ्या कोणते खेळाडू आहेत टॉप 10 मध्ये
IPL 2022, SRH vs KKR : आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सनराइजर्स सामना, कोलकाता दुसरं स्थान कायम राखणार?