IPL 2022, MI vs LSG : लखनौकडून मुंबई इंडियन्सला 200 धावांचे लक्ष्य, इंडियन्स लक्ष्य पूर्ण करणार?
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आजच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या सामना सुरु आहे. यात लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 199 धावा काढल्या असून लखनौने मुंबई इंडियन्सला 200 धावांचं टार्गेट दिलं.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आजच्या मुंबई इंडियन्स ( MI )विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला. यावेळी लखनौला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर लखनौच्या संघाने जोरदार फलंदाजी करायला सुरवात केली. यावेळी 60 बॉलमधे सर्वाधिक 103 धावा केएल राहुलने काढल्या. यामध्ये त्याने तब्बल 9 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे राहुलने आजच्या सामन्यात आयपीएलमधलं तिसरं शतक पूर्ण केलंय. राहुलनंतर सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला मनीष पांडे. याने 29 बॉलमध्ये 38 धावा काढल्या. यापैकी सहा चैकार मनीष पांडेनं मारले. यानंतर डी कॉकने 24 धावा तेरा बॉलमध्ये काढल्या. यात एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. दीपक हुड्डाने 8 बॉलमध्ये 15 धावा काढल्या. यामध्ये दीपकने एक चौकार आणि एक षटकार मारला. तर स्टॉईनसने नऊ बॉलमध्ये दहा धावा काढल्या. त्यात त्याने एक षटकार मारला आहे. क्रुणाल पंड्याने एक बॉलमध्ये एक रन काढला. अशा प्रकारे लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 199 धावा काढल्या असून लखनौने मुंबई इंडियन्सला 200 धावांचं टार्गेट दिलं.
गुणतालिकेचं काय गणित?
आज खेळवल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यात गुणतालिकेचा विचार केल्यास यामध्ये मुंबई इंडियन्सने अद्यापही खातं उघडलेलं नाही. तर दुसरीकडे लखौचा संघा गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे लखनौला आज गुणतालिकेत आगेकुच करण्याची संधी असणार आहे. आज लखनौ कशी कामिगिरी करणार, याकडे लक्ष असेल.
इंडियन्स गुणतालिकेत शेवटी
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आतापर्यंत पाचवेळा जेतेपदी राहिलेल्या इंडियन्सला यंदा खेळवलेल्या पाच सामन्यात एकदाही यश आलेलं नाही. सलग पाच सामन्यात मुंबई इंडियन्स पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत तो अखेरच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. त्यामुळे आजच्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे लखनौ चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे. नसात मुंबई इंडियन्स हा सामना खिशात घालून विजयावर शिक्कामोर्तब करेल.
इतर बातम्या
Ahemadnagar : नोकरी चांगली आहे फक्त ‘नगरला’ जावं लागेल ! सविस्तर माहिती खाली दिलीये वाचा…
Mumbai High Court : कामात अडथळा आणू नका!; इमारत पुनर्विकासासंबंधी मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल