IPL 2022, MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा पराभवाचा षटकार, लखनौ 18 धावांनी जिंकला
आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 199 धावा काढल्या असून लखनौने मुंबई इंडियन्सला 200 धावांचं टार्गेट दिलं होतं. पण, मुंबई इंडियन्सला ते पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या पराजयाचा षटकार उडालाय.
मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौच्या (LSG) सामन्यात इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागलाय. तर दुसरीकडे लखनौ 18 धावांनी विजयी झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात सूर्यकुमार यादव याने 27 बॉलमध्ये 37 धावा काढल्या. त्यामध्ये त्याने तीन चौकार मारले. त्यानंतर सर्वाधिक धावा काढणारा. ब्रेव्हिस होता. त्याने तेरा बॉलमध्ये 31 धावा काढल्या. त्यामध्ये सहा चौकार आणि एक षटकार त्याने मारला. त्यानंतर वर्मान 26 धावा काढल्या. त्यापैकी दोन चौकार त्याने मारले. त्यानंतर पंचवीस धावा चौदा बॉलमध्ये पोलार्डने काढल्या. किशनने तेरा, उनाडकटने चौदा, शर्मा रोहितने सहा धावा काढल्या. यामुळे मुंबई इंडियन्सला 181 धावांपर्यंतच पोहचता आलं आणि लखनौचा 18 धावांनी विजय झाला.
लखनौचं इंडियन्सला 200 धावांचं लक्ष्य
लखनौला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर लखनौच्या संघाने जोरदार फलंदाजी करायला सुरवात केली. यावेळी 60 बॉलमधे सर्वाधिक 103 धावा केएल राहुलने काढल्या. यामध्ये त्याने तब्बल 9 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे राहुलने आजच्या सामन्यात आयपीएलमधलं तिसरं शतक पूर्ण केलंय. राहुलनंतर सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला मनीष पांडे. याने 29 बॉलमध्ये 38 धावा काढल्या. यापैकी सहा चैकार मनीष पांडेनं मारले. यानंतर डी कॉकने 24 धावा तेरा बॉलमध्ये काढल्या. यात एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. दीपक हुड्डाने 8 बॉलमध्ये 15 धावा काढल्या. यामध्ये दीपकने एक चौकार आणि एक षटकार मारला. तर स्टॉईनसने नऊ बॉलमध्ये दहा धावा काढल्या. त्यात त्याने एक षटकार मारला आहे. क्रुणाल पंड्याने एक बॉलमध्ये एक रन काढला. अशा प्रकारे लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 199 धावा काढल्या असून लखनौने मुंबई इंडियन्सला 200 धावांचं टार्गेट दिलं होतं.
केएल राहुलने इतिहास रचला
शेष म्हणजे राहुलने आजच्या सामन्यात शतक पूर्ण केलंय. राहुलने आयपीएलमधील 100 वा सामना संस्मरणीय बनवला आहे. 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा राहुल हा पहिला फलंदाज आहे. त्याने आयपीएलच्या 15 व्या सीजनमधील दुसरे शतक झळकावलं. त्याच्या आधी जोस बटलरनेही मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते. IPL 2022 च्या 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौच्या संघाने स्फोटक फलंदाजी केली. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने आयपीएलमधील तिसरे शतक झळकावले आहे.
इतर बातम्या