IPL 2022, MI vs RR Live Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल मुंबई विरुद्ध राजस्थान सामना

एक-दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सची आयपीएल 2022 मध्ये खराब सुरुवात झाली आहे. मुंबईला दिल्लीविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता विजयाचं खातं उघडण्यासाठी शनिवारी होणाऱ्या डबल हेडर सामन्यात संघाचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.

IPL 2022, MI vs RR Live Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल मुंबई विरुद्ध राजस्थान सामना
MI vs RRImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 8:00 AM

मुंबई : एक-दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सची आयपीएल 2022 मध्ये खराब सुरुवात झाली आहे. मुंबईला दिल्लीविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता विजयाचं खातं उघडण्यासाठी शनिवारी होणाऱ्या डबल हेडर सामन्यात संघाचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघाला या सामन्यात कोणत्याही किंमतीत विजय मिळवायचा आहे जेणेकरून त्यांना यंदाच्या मोसमातील विजयाचं खातं उघडता येईल. मात्र, संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ पहिला सामना जिंकल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार असल्याने मुंबईसाठी हे आव्हान सोपं नसेल

या मोसमातील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. या सामन्यात त्यांनी हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. तर मुंबईचा दिल्लीकडून पराभव झाला. आता दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा राजस्थान रॉयल्सचा संघ आपली मागील आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न करेल. आकडेवारीचा विचार करता मुंबईचा संघ राजस्थानवर थोडा वरचढ राहिला आहे.

उद्याच्या सामन्यात होऊ शकतात दोन बदल

दोन्ही टीम्सच्या प्लेइंग इलेवन बद्दल बोलायचं झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी एक जमेची बाजू आहे. सूर्यकुमार यादव उद्याच्या सामन्यात खेळू शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सची मधली फळी बळकट होणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत सूर्युकमार यादवला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून न सावरल्यामुळे सूर्यकुमार दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. अनमोलप्रीत सिंहच्या जागेवर सूर्यकुमारला संघात स्थान दिले जाईल.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील IPL-2022 मधला पहिला सामना कधी खेळवला जाईल?

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील IPL-2022 मधला सामना शनिवार, 2 एप्रिल रोजी खेळवला जाईल

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाणार?

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय.पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यासाठी दुपारी 3 वाजता नाणेफेक होणार आहे, तर पहिला डाव 3.30 वाजता सुरू होईल.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पाहता येईल?

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग ऑनलाइन कुठे पाहता येईल?

लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह Disney+Hotstar वर सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील

इतर बातम्या

MI vs RR Playing XI IPL 2022: MI च्या टीममध्ये उद्या दोन बदल, कशी असेल प्लेइंग इलेवन, राजस्थानचे कुठले खेळाडू मुंबईसाठी धोकादायक

IPL 2022 GT vs DC Live Streaming: गुजरात टायटन्स वि दिल्ली कॅपिटल्स LIVE मॅच तुम्ही कधी, कुठे आणि कशी पाहू शकता?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.