IPL च्या 15 व्या सीजनवर काही खेळाडूंनी आपली विशेष छाप उमटवली. त्यापैकी एक आहे टिम डेविड. टिम डेविडने पुढच्या सीजनसाठी खूप अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत.
आता Mumbai Indians चाहत्यांच्या तोंडी टिम डेविड हे नाव बसलय. कारण त्याने खेळच असा दाखवला. पुढच्या सीजनमध्ये मुंबईला कायरन पोलार्डची कमतरता जाणवणार नाही, कारण आता डेविड मुंबईकडे आहे.
टिम डेविड मुंबईकडून सर्व सामने खेळला असता, तर कदाचित आज मुंबई प्लेऑफमध्ये खेळली असती. आज अनेक दिग्गज टिम डेविडवरुन मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट् स्टाफला जाब विचारत आहेत.
टिम डेविडला सुरुवातीचे दोन सामने खेळवलं. नंतर सहा सामने बसवून ठेवलं. पण त्यानंतर डेविडने जे कमबॅक केलं, त्याला तोड नाही. त्याने एकहाती सामने फिरवले.
टिम डेविडचं खासगी आयुष्य कसं आहे, या बद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. तर डेविडची पत्नी एक प्रसिद्ध हॉकीपटू आहे. ती ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधीत्व करते.
स्टेफनी करशॉ हे टिम डेविडच्या पत्नीचं नाव आहे. डेविड प्रमाणे त्याच्या बायकोने सुद्धा स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केलीय.
टिम डेविड फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये लोकप्रिय नाव आहे, तर स्टेफनी करशॉ महिला हॉकी मधली एक नावाजलेली खेळाडू आहे.
स्टेफनी करशॉ भारतीय महिला संघाला कधीही विसरणार नाही. कारण भारताच्या महिला हॉकीपटूंनी तिला एक कटू आठवण दिली आहे.
स्टेफनी करशॉ मागच्यावर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. तिने ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
स्टेफनी करशॉ खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला हॉकी संघाला क्वार्टर फायनलमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने पराभूत केलं होतं. भारतीय महिला संघाने स्टेफनी करशॉ सह संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला कधीही न विसरता येणारं दु:ख दिलं होतं. भारतीय महिला संघाने या विजयासह इतिहास रचला होता.