IPL 2022, Orange Cap : बटलरला धोका, ऑरेंज कॅपमध्ये डिकॉकची आगेकुच, पर्पलच्या यादीत उमेश ‘राज’ कायम
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय. गुरुवारी दिल्ली कॅपीटलवर लखनौने विजय मिळवून विजयाचीच हॅट्रिक केली आहे. यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या टेबलमध्ये बदल झालाय.
मुंबई : IPLच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (DC VS LSG) सामना झाला. लखनौ सुपर जायंट्सने विजयाची हॅट्ट्रिक केली. चेन्नई सुपर किंग्स (CSK), सनरायजर्स हैदराबादनंतर लखनौ सुपर जायंट्सने गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीने (Ayush Badoni) षटकार ठोकून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या. या विजयामुळे लखनौचा आत्मविश्वास उंचावला आहे. दिल्लीच्या संघातून गुरुवारी एनरिच नॉर्खिया आणि डेविड वॉर्नर हे मोठे खेळाडू खेळले. दरम्यान, आयपीएलच्या या गुरुवारी झालेल्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपल्या यादीत पुन्हा एकदा बदल झालाय.
ऑरेंज कॅपमध्ये कोण अव्वल?
राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलर धावांच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. बटलरने आपयपीएलच्या या सीजनमध्ये 200 पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. त्यानंतर क्विंटन डिकॉकच्या 149 धावा झाल्या असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने अर्थशतक पूर्ण केलं आहे. डिकॉकने मुंबई इंडियन्सचा ओपनर इशान किशनला मागे पाडलं आहे. इशानने देखील 149 धावा काढल्या आहेत. मात्र, क्विंटनचा रन रेट इशानपेक्षा अधिक आहे. तिसऱ्या क्रमांकावर इशान किशन आहे. चौथ्या क्रमांकावर केएल राहुल असून त्याने 132 धावा केल्या आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर दीपक होडा आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 130 धावा केल्या आहेत.
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
पर्पल कॅपचा मानकरी कोण?
पर्पल कॅपच्या यादीत उमेश यादीव पहिल्या क्रमांकावर कायम आहे. उमेशन आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये तब्बल 9 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर युझवेंद्र चहल असून त्याने या सीजनमध्ये एकूण 7 विकेट घेतल्या आहेत. तर आवेश खानने देखील सात विकेट घेतल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलाय राहुल चहर. याने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सहा विकेट घेतल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर कुलदीप यादव आहे. कुलदीपने देखील सहा विकेट घेतल्या आहेत.
इतर बातम्या
नाशिक-पुणे रेल्वेच्या भूसंपादन दरात शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने; 3 वर्षांच्या खरेदी पटीत दर कमी
नवरात्रीच्या सातव्या दिवशी होणार देवीच्या कालरात्री रुपाचा जागर जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
Navratri 2022 | शनि, राहू-केतू त्रास देत आहेत ?, मग दुर्गा महाअष्टमीला करा हे उपाय