IPL 2022 Retained Players: 10 संघांमध्ये 33 खेळाडूंचा समावेश, जाणून घ्या कोणत्या संघाकडे किती पैसे?

IPL 2022 Auction: या आठवड्यात IPL 2022 साठी मेगा ऑक्शन (IPL 2022 Auction) होणार आहे. हा लिलाव अनेक अर्थाने खास असणार आहे, ज्यामुळे आगामी काही वर्षांसाठी संघांची रूपरेषा तयार होईल. यावेळी जुन्या आठ संघांव्यतिरिक्त दोन नवीन संघांचाही लिलावात (IPL 2022 Mega Auction) सहभाग असणार आहे.

IPL 2022 Retained Players: 10 संघांमध्ये 33 खेळाडूंचा समावेश, जाणून घ्या कोणत्या संघाकडे किती पैसे?
IPL Teams
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 2:36 PM

मुंबई : या आठवड्यात IPL 2022 साठी मेगा ऑक्शन (IPL 2022 Auction) होणार आहे. हा लिलाव अनेक अर्थाने खास असणार आहे, ज्यामुळे आगामी काही वर्षांसाठी संघांची रूपरेषा तयार होईल. यावेळी जुन्या आठ संघांव्यतिरिक्त दोन नवीन संघांचाही लिलावात (IPL 2022 Mega Auction) सहभाग असणार आहे. अहमदाबाद आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ पहिल्यांदाच लिलावात सहभागी होणार आहेत. अशा स्थितीत यावेळचा लिलाव खूपच रंजक असणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथे लिलाव होणार आहे. लिलावापूर्वी, सर्वच संघांनी त्यांच्याकडील महत्त्वाच्या खेळाडूंना संघात (IPL Player Retention) कायम ठेवले आहे आणि आता ते उर्वरित पर्स व्हॅल्यूसह संघ पूर्ण करण्यासाठी लिलावात उतरतील.

सध्याच्या आठ संघांना यापूर्वी 4 खेळाडू संघात कायम ठेवण्याची संधी देण्यात आली होती. नियमांनुसार, प्रत्येक संघ जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवू शकतो, त्यामध्ये तीनपेक्षा जास्त भारतीय आणि दोनपेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत. तसेच प्रत्येक संघ जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडू संघात कायम ठेवू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने एका परदेशी खेळाडूसह चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. आरसीबी, एसआरएच आणि राजस्थानने प्रत्येकी तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. पंजाब किंग्जने त्यांच्यासोबत फक्त दोन खेळाडू ठेवले आहेत.

संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

1. मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले 4 खेळाडू

  • पहिला खेळाडू – रोहित शर्मा, 16 कोटी रुपये.
  • दुसरा खेळाडू – जसप्रीत बुमराह, 12 कोटी रुपये.
  • तिसरा खेळाडू – सूर्यकुमार यादव, 8 कोटी रुपये.
  • चौथा खेळाडू – कायरन पोलार्ड, 6 कोटी रुपये

2. पंजाब किंग्सने रिटेन केलेले खेळाडू

  • मयंक अग्रवाल – 14 कोटी रुपये
  • अर्शदीप सिंह – 4 कोटी रुपये

3. हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू

  • पहिला खेळाडू – केन विल्यमसन, 14 कोटी रुपये
  • दुसरा खेळाडू – अब्दुल समद – 4 कोटी रुपये
  • तिसरा खेळाडू – उमरान मलिक- 4 कोटी रुपये

4. चेन्नईने रिटेन केलेले खेळाडू

  • पहिला खेळाडू – रवींद्र जाडेजा, 16 कोटी रुपये
  • दुसरा खेळाडू – एमएस धोनी, 12 कोटी रुपये
  • तिसरा खेळाडू – मोईन अली, 8 कोटी रुपये
  • चौथा खेळाडू – ऋतुराज गायकवाड, 6 कोटी रुपये

5. दिल्लीने रिटेन केलेले खेळाडू

  • पहिला खेळाडू – ऋषभ पंत, 16 कोटी रुपये
  • दुसरा खेळाडू – अक्षर पटेल, 9 कोटी रुपये
  • तिसरा खेळाडू – पृथ्वी शॉ, 7.5 कोटी रुपये
  • चौथा खेळाडू – एनरिक नॉर्खिया, 6.5 कोटी रुपये

6. कोलकाताने रिटेन केलेले खेळाडू

  • पहिला खेळाडू – आंद्रे रसेल, 12 कोटी रुपये
  • दुसरा खेळाडू – वरुण चक्रवर्ती, 8 कोटी रुपये
  • तिसरा खेळाडू – व्यंकटेश अय्यर, 8 कोटी रुपये
  • चौथा खेळाडू – सुनील नारायण, 6 कोटी रुपये

7. राजस्थान रिटेन केलेले खेळाडू

  • पहिला खेळाडू – संजू सॅमसन – 14 कोटी रुपये
  • दुसरा खेळाडू – जॉस बटलर – 10 कोटी रुपये
  • तिसरा खेळाडू – यशस्वी जयस्वाल – 4 कोटी रुपये

8. बँगलोरने रिटेन केलेले खेळाडू

  • पहिला खेळाडू – विराट कोहली, 15 कोटी रुपये
  • दुसरा खेळाडू – ग्लेन मॅक्सवेल, 11 कोटी रुपये
  • तिसरा खेळाडू – मोहम्मद सिराज, 7 कोटी रुपये

9. अहमदाबादने संघात घेतलेले खेळाडू

  • हार्दिक पंड्या
  • राशिद खान
  • शुभमन गिल

10. लखनौ संघाने संघात घेतलेले खेळाडू

  • के. एल. राहुल
  • मार्कस स्टॉयनिस
  • रवी बिष्णोई

कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती रुपये?

सध्या पंजाब किंग्सच्या पर्समध्ये सर्वात जास्त पैसे आहेत. पंजाबच्या संघमालकांकडे 72 कोटी रुपये आहेत. पंजाब किंग्जनंतर सनरायझर्स हैदराबादकडे सर्वात जास्त पैसे आहेत. हैदराबादच्या पर्समध्ये 68 कोटी रुपये, राजस्थान रॉयल्सकडे 62 कोटी, लखनऊ संघाकडे 59 कोटी आणि अहमदाबादकडे 52 कोटी रुपये आहेत. याशिवाय चेन्नई, कोलकाता आणि मुंबईकडे 48 कोटी रुपये आहेत. दिल्लीकडे सर्वात कमी 47.50 कोटी रुपये शिल्लक आहेत.

इतर बातम्या

IPL 2022 Auction: बंगळुरुतल्या 2 दिवसांच्या महालिलावात 590 खेळाडूंची विक्री, धवन, वॉर्नर, श्रेयस, बोल्टवर सर्वांच्या नजरा

IPL 2022 Auction: 5 तगड्या खेळाडूंवर मुंबई इंडियन्सची नजर, पर्स रिकामी करणार?

IPL 2022: हार्दिकच्या अहमदाबाद फ्रेंचायजीने संघाच्या नावाची केली घोषणा, काय ठेवलं नाव?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.