मुंबई: आयपीएल (IPL 2022) पंधराव्या सीजनचा सध्या सगळीकडे माहोल आहे. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील सोमवारी झालेल्या पंजब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या (PBKS vs CSK) सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल झालाय. यात कोणता संघ अव्वल स्थानी आहे. याविषयी नेहमी चर्चा होत असते. प्रत्येकाचा आवडता संघ असतो तो कोणत्या स्थानी आहे, हे जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतं. दरम्यान, त्यापूर्वी कालच्या सामन्यात काय झालं ते जाणून घेऊया. काल पंजाबच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकला. पंजाबचा आयपीएलमधील हा चौथा विजय आहे. पंजाबच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा (Play off) मार्ग अधिक खडतर बनला आहे. चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते नवव्या स्थानावर आहेत. कालच्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल झालाय.
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या स्थानी आहे. गुजरातने सातपैकी सहा सामने जिंकले आहे. तर एक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यानंतर दुसऱ्या स्थानी हैरदाबाद संघ आहे. हैदराबाद संघाने सातपैकी पाच सामने जिंकले असून दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. तिसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. या संघाने एकूण सात सामने खेळल असून त्यापैकी पाच सामन्यात त्यांना यश आलंय तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. चौथ्या स्थानी लखनौ संघ आहे. या संघाने एकूण आठ सामने खेळले आहे. त्यापैकी त्याला पाच सामन्यात यश आलंय तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. पाचव्या स्थानी बंगलौर संघ असून त्याने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत . त्यापैकी या संघाला पाच सामन्यात यश आलंय तर तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
चेन्नईला या सामन्यात विजयाच्या आशा पल्लवित करता आल्या, त्या अंबाती रायुडूमुळे. रायुडूने आज खेळपट्टीवर आल्यापासून तुफान बॅटिंग केली. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने 39 चेंडूत 78 धावा फटकावल्या. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पण मोक्याच्याक्षणी कागिसो रबाडाच्या यॉर्करवर तो बोल्ड झाला. ती गेमचेंजिग ओव्हर ठरली. चेन्नईच्या तीन विकेट आज झटपट गेल्या. पण ऋतुराज गायकवाड आणि रायुडूने दबाव न घेता खेळ सुरु ठेवला. ऋतुराजने 30 धावांची खेळी केली. धोनीने आठ चेंडूत 12 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार होता.
इतर बातम्या
Skin : मेकअप काढण्यासाठी या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!