IPL 2022 points table : पंजाबविरुद्ध केकेआर विजयी, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022 points table: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) शनिवारी सुरुवात झाली आहे. शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबवर विजय मिळवत घवघवीत यश मिळवलंय. तर दुसरीकडे पंजाबवरील विजयाचा लखनऊ आणि बंगळुरू संघाला फायदा होऊ शकतो. ते जाणून घ्या...

IPL 2022 points table : पंजाबविरुद्ध केकेआर विजयी, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…
पंजाबविरुद्ध केकेआर विजयीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 8:48 AM

मुंबई : क्रिकेट म्हटलं की कधी एखादा संघ पुढे असतो आणि कधीकधी एखादा संघ मागेही असतो. खेळ म्हटलं की विजय-पराजय आलाच. आयपीएल 2022 मध्ये आता चांगलीच रंगत आली आहे. आयपीएलचा पहिला आठवडा देखील आता पूर्ण झाला आहे. या पहिल्या आठवड्यात आठ सामने खेळवले गेले असून पॉईंट्स टेबलमध्ये देखील अनेक बदल झाले आहेत. विशेष बदल झाला तो शुक्रवारी झालेल्या आठव्या सामन्यात. कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata knight riders) पंजाब किंग्जवर (Panjab Kings) विजय मिळवला. यावेळी केकेआरने पंजाब किंग्जला 14 ओवर 3 बॉलमध्ये 6 विकेटनं हरवलं. याचवेळी पंजाबसोबत कोलकाता नाईट रायडर्स जिंकलाच आणि दुसरीकडे तो गुणतालिकेत सरळ पहिल्या स्थानावर येऊन पोहचला. तर पंजाब किंग्सला मात्र मोठा फटका सहन करावा लागलाय. यात एक विशेष बाब म्हणजे आंद्रे रसेलच्या (Andre Russell) ताब्यात सध्या ऑरेंज कॅप आली आहे.

स्फोटक गोलंदाजीनंतर यशोशिखर

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जच्या सामन्यात केकेआरच्या स्फोटक गोलंदाजीमुळे पंजाब किंग्सला 20 ओवरही पूर्ण करता आल्या नाही. पंजाब किंग्जसाल फक्त 137 रन बनवता आले. पंजाब किंग्जचे हे हाल केले वेगवान गोलंदाज उमेश यादव याने. केकेआरच्या पेसरने चार विकेट घेऊन पंजाबला शांत केलं. त्यानंतर फलंदाजीने आंद्रे रसलनं चांगलंच धुतल्याचं दिसून आलं. यावेळी 31 बॉलमध्ये 8 षटकारच्या मदतीने 70 रन बनवून रसेलने संघाला विजय मिळवून दिला. यानंतर लगेच कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आलाय.

IPL पॉइंट टेबलची स्थिती

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

गुणतालिकेत केकेआर अव्वल

कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आला आहे. केकेआरने आतापर्यंत तिन सामने खेळले आहेत. यामध्ये दोन सामने केकेआर जिंकलाय तर एका सामन्यात त्याला पराजयाचा सामना करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सशिवाय कोणताही संघ दोन सामना नाही जिंकू शकला. कोलकाता नाईट रायडर्सचे आता चार पाईंट्स आहेत. या विजयानंतर त्याचा नेट रन रेट 0.093 वरुन 0.843 वर पोहचलाय. यामुळे केकेआर हा पाचव्या स्थानावरुन थेट पहिल्या स्थानावर आला आहे.

या संघांना होणार फायदा

आता आठ सामने खेळल्यानंतर आलेल्या बदलानुसार राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कपिटल्स पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एक-एक स्थान वर चढले असून ते पांचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. आता सगळ्यांच्या नजरा आज होणाऱ्या सामन्यावर आहेत. आज मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत तर गुजरातचा सामना दिल्लीसोबत होणार आहे.

इतर बातम्या

Tiger Death : कॅनलमध्ये पडून मृत झालेल्या वाघाचं गूढ कायम, शिकार झाल्याचा प्राथमिक अंदाज; वनविभागाचे मौन

Remo Dsouza Birthday : एकेकाळी खायचे वांदे असणारा रेमो डिसूझा आता आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक, वाचा त्याचा संघर्षमय प्रवास…

Prabhakar Sail | कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण, एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांचे निधन

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.