IPL 2022 points table : लखनौची आगेकुच, हैदराबाद मात्र निराश, IPLमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…
लखनौ आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आलाय. तर दुसरीकडे हैदराबादच्या हाती पुन्हा निराशा लागल्याचं चित्र आहे. आयपीएलच्या टॉप संघाविषयी बोलायचं झाल्यास पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. या संघाने दोन सामने खेळले असून ते दोन्हीही जिंकले आहेत. IPLमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…
मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super giants) इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत सोमवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. यामुळे लखनौ आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये (Points Table) पाचव्या स्थानी आलाय. तर दुसरीकडे हैदराबादच्या हाती पुन्हा निराशा लागल्याचं चित्र आहे. आयपीएलच्या टॉप संघाविषयी बोलायचं झाल्यास पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. या संघाने दोन सामने खेळले असून ते दोन्हीही जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सने तीन सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यांत त्यांना विजय मिळाला आहे. त्यामुळे केकेआरनं दुसरं स्थान शाबूत ठेवलं आहे. त्यानंतर येतो गुजरातचा संघ. या संघाने दोन्हीही सामन्यात यश मिळवलंय. त्यामुळे तो तिसऱ्या स्थानी आहे. तर पंजाब चौथ्या आणि आता पाचव्या स्थानी लखनौचा संघ आलाय. त्यामुळे दिल्ली कॉपिट्ल्स संघावर सहाव्या स्थानी जाण्याची वेळ आलीय.
IPL पॉइंट्सच्या टेबलची स्थिती
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
लखनौचा सलग दुसरा विजय
लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत सोमवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर काल आपीएल 2022 मधील हा 12 वा सामना होता. या अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 12 धावांनी विजय मिळवला. लखनौचा संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळला असून त्यांनी दोन विजय मिळवले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या लढतीत त्यांनी चेन्नई सुपर किंग्सचे 211 धावांचे डोंगराऐवढे लक्ष्य पार केलं. काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात त्यांनी 169 धावांचा यशस्वी बचाव केला. लखनौच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी कामगिरी उंचावली. केएल राहुलने आज कॅप्टन इनिंग्स खेळत शानदार अर्धशतक झळकावलं. संघाच्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या. त्याने 50 चेंडूत 68 धावा केल्या. केएल राहुलला पहिल्या सामन्यात खात सुद्धा उघडता आलं नव्हतं. दुसऱ्या सामन्यात 40 धावा करुन त्याने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राहुलची अर्धशतकाची संधी हुकली होती. यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झालाय.
राहुलचं 28 वं अर्धशतक
राहुलला कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवावा लागणार होता. कारण लखनौच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभीच टीमच्या तीन विकेट गेल्या होत्या. दुसरा सलामीवीर क्विंटन डि कॉकला वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. चौथ्या ओव्हरमध्ये सुंदरने इविन लुईसची मोठी विकेट काढली. लुईस बाद झाला त्यावेळी लखनौच्या दोन बाद 16 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मनीष पांडे सुद्धा तंबूत परतला. संघाची धावसंख्या तीन बाद 27 होती. केएल राहुल आणि दीपक हुड्डाने चौथ्या विकेटसाठी शानदार भागीदारी करुन टीमला संकटातून बाहेर काढलं. त्यांनी 87 धावांची भागीदारी केली. राहुलने 40 चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएलमधील हे त्याचं 28 वं अर्धशतक आहे.
इतर बातम्या
ST Strike : एसटी महामंडळाची कंत्राटी पद्धतीने भरती सुरू, आत्तापर्यंत 52 जणांना केलं नियुक्त
Pune Crime | आरारारारारा खतरनाक…. 92 तलवारी, 9 खंजीर; पिंपरी चिंचवडमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त