IPL 2022 points table : लखनौकडून विजयाची हॅट्रिक, आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये रंगत, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये गुरुवारी दिल्ली कॅपिटलवर लखनौनं विजय मिळवलाय. विशेष म्हणजे या विजयानंतर लखनौची विजयाची हॅट्रिक झालीय. गुरुवारी झालेल्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालाय.
मुंबई : आयपीएलच्या पंराव्या सीजनमध्ये गुरुवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) सामन्यात लखनौने विजयाची हॅट्रिक केली. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या. या विजयामुळे लखनौचा आत्मविश्वास उंचावला आहे. चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद नंतर लखनौ सुपर जायंट्सने गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीने (Ayush Badoni) षटकार ठोकून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीच्या संघातून गुरुवारी एनरिच नॉर्खिया आणि डेविड वॉर्नर हे मोठे खेळाडू खेळले. दरम्यान, या दिल्ली आणि लखनौच्या सामन्यानंतर गुरुवारी पॉईट्सच्या टेबलमध्ये बदल झाले आहेत.
तुमचा संघ नेमका कुठे?
दिल्ली आणि लखनौच्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचे सर्वाधिक सहा पॉईंट्स आहेत. तर लखनऊ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्यातच लखनौच्या एन्ट्रीने दुसऱ्या संघांना फटका बसला आहे. राजस्थान रॉयल्स चार पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर गुजरात संघाचेही चार पॉईट्स आहेत. तर पंजाब किंग्स पाचव्या स्थानावर आला आहे.
IPL पॉइंट्सच्या टेबलची स्थिती
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
लखनौला मोठं यश
लखनौच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये धावा दिल्या. पण पृथ्वी शॉ आऊट झाल्यानंतर झटपट दोन विकेट घेतल्या आणि दिल्लीच्या धावगतीला वेसण घातली. रवी बिश्नोईने डेविड वॉर्नर आणि रोव्हमॅन पॉवेल या दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. त्याने चार ओव्हर्समध्ये 22 धावा देत दोन विकेट काढल्या. 15 षटकानंतर हाणामारीच्या ओव्हर्समध्ये खासकरुन शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये आवेश खान आणि जेसन होल्डरने फार धावा दिल्या नाहीत. त्यांनी ऋषभ पंत आणि सर्फराझ खानला जखडून ठेवलं. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीला 149 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिल्ली कॅपिटल्सला पृथ्वी शॉ ने चांगली सुरुवात करुन दिली. पावरप्लेमध्ये दिल्लीच्या बिनाबाद 52 धावा झाल्या होत्या. पृथ्वीने 34 चेंडूत 61 धावांची खेळी केली. पण पृथ्वी आऊट झाल्यानंतर सात धावात दोन विकेट गेल्या. तर दुसरीकडे पृथ्वी शॉ यो-यो टेस्टमध्ये फेल कसा झाला? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पृथ्वी शॉ सलग तीन रणजी सामने खेळला, त्यामुळे तो थकला होता. शॉ या तिन्ही सामन्यादरम्यान बायो-बबलमध्ये होता. दरम्यान, पृथ्वी यो-यो टेस्टमध्ये फेल झाला असला, तरी सामना जिंकून देण्याची त्याची क्षमता सर्वांना माहित आहे.
इतर बातम्या
kalyan News : कल्याणमध्ये आज वीजपुरवठा खंडीत, जाणून घ्या कोणत्या भागात जाणार किती वेळ लाईट
Yashwant Jadhav | यशवंत जाधवांना मोठा झटका, 40 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, सूत्रांची माहिती