मुंबई : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या तेराव्या सामन्यात संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय (RR vs RCB) मिळवला. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मंगळवारी एक रंगतदार सामना पहायला मिळाला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यामध्ये होते. चांगल्या सुरुवातीनंतर RCB चा संघ एका टप्प्यावर सामना गमावतोय असं दिसतं होतं. पण अनुभव दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शाहबाज अहमदच्या साथीने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. टी 20 क्रिकेटमधली खरी रंगत या सामन्यामधून अनुभवता आली. टी 20 तुम्ही वेगवान सुरुवात करा किंवा धीमी. सामन्याचा नूर पालटण्यासाठी एक-दोन षटक पुरेशी असतात. तेच आजच्या सामन्यात घडलं. तत्पूर्वी आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं हेतं. या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीमध्ये बदल झाला.
मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या तेराव्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत बदल झालाय. मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जोस बटलरने दमदार फलंदाजी केली. बटलरच्या फलंदाजीमुळेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्सला निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये 169 पर्यंत पोहोचता आले. जोस बटलरने मागच्या दोन सामन्यांप्रमाणे मंगळवारी आक्रमक सुरुवात केली नाही. यानंतर बटलरचे एकूण 205 धावा झाल्या असून तो ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इशान कायम असू त्याने 135 धावा काढल्या आहेत. त्यानंतर फाफ डु प्लेसीस या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने आतापर्यंत 122 धावा काढल्यायेत. त्यानंतर लखनौचा दीपक हुडा चौथ्या क्रमांकावर आला असून त्याने 119 धावा केल्या आहेत. शिमरॉन हेटमायर याने 109 धाव केल्याने तो पाचव्या स्थानावर आहे.
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. पर्पल कॅपच्या शर्यतीत कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव पहिल्या क्रमांकावर आहे. आरसीबी आणि आरआर या दोन्ही संघाच्या सामन्यानंतर युजवेंद्र चहल यांच्या सात विकेट झाल्या असून तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यानंतर लखनौचा आवेश खान तिसऱ्या क्रमांकावर त्याने घेतलेल्या विकेटची संख्या सात आहे. तर चौथ्या स्थानावर पंजाब किंग्सचा राहुल चहर असून त्याने सहा विकेट घेतल्या आहेत. पाचव्या स्थानावर वानेंदु असून त्याने सहा विकेट घेतल्या आहेत.
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
इतर बातम्या
तुम्हालाही क्रेडिट कार्ड हवय? मग आधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
Basmati Rice: बासमती तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा, कृषी शास्त्रज्ञांची संशोधन आले कामी..!