मुंबई: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायर IPL 2022 स्पर्धा अर्ध्यावर सोडून घरी निघाला आहे. त्याने मायदेशी वेस्ट इंडिजला प्रयाण केलं आहे. काल पंजाब किंग्स विरुद्ध संघाला विजय मिळवून दिल्यानंतर शिमऱॉन हेटमायर (Shimron hetmyer) लगेच घराच्या दिशेने निघाला. राजस्थान रॉयल्सने काल IPL 2022 मध्ये पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. शिमरॉन हेटमयारने काल संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी 190 धावांचे टार्गेट दिले होते. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालसह सर्वच फलंदाजांनी योगदान दिले. पण शेवटी शिमरॉन हेटमायरची भूमिका महत्त्वाची होती. त्याने 16 चेंडूत नाबाद 31 धावा फटकावल्या. यात तीन चौकार आणि दोन षटकार होते. शिमरॉन हेटमायर अचानक घरी परततोय, त्यामागे एक कारण आहे. राजस्थान रॉयल्सने टि्वट करुन हेटमायर गुयानामधील आपल्या घरी निघाल्याची माहिती दिली आहे.
राजस्थान रॉयल्सने आपल्या टि्वटमध्ये शिमरॉन हेटमायरची घरी जाण्याची वेळ आणि कारण या दोन्हींची माहिती दिली आहे. हेटमायर पुन्हा परतणार की, नाही याची माहिती सुद्धा टि्वट मध्ये दिली आहे. शिमरॉन हेटमायर आज सकाळी गुयानासाठी रवाना झाला. हेटमायरची पत्नी एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. त्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी हेटमायर लगेच मायदेशी निघाला आहे. हेटमायरची पत्नी निर्वानी आई होणार आहे.
Shimron Hetmyer has travelled back to Guyana early morning today for the imminent birth of his first child, but he’ll be back soon. ?
Read more: https://t.co/cTUb3vFiNl#RoyalsFamily | @SHetmyer pic.twitter.com/u52aO9Dcct
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2022
हेटमायर गुयानाला गेल्यानंतर पुन्हा आयपीएल खेळण्यासाठी येणार का?, तर या प्रश्नाच उत्तर आहे, हो. पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर हेटमायर पुन्हा मुंबईत परतणार आहे. IPL 2022 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची स्थिती चांगली आहे. आतापर्यंत त्यांनी 11 सामने खेळले आहेत. यात सात विजय आणि चार पराभव झाले आहेत. 14 गुणांसह राजस्थानचा संघ पॉइंटस टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आणखी दोन विजय मिळवल्यास, राजस्थानचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होऊ शकते.
IPL 2022 मध्ये शिमरॉन हेटमायर राजस्थाचना प्रमुख आधारस्तंभ आहे. त्याने 11 सामन्यात 291 धावा केल्या आहेत. संघाचा डाव अडचणीत असताना तो संकटमोचक ठरला आहे. 72.75 च्या सरासरीने 166 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने त्याने धावा केल्या आहेत. एक अर्धशतकही त्याने फटकावलं आहे.