IPL 2022 RR vs GT Live Streaming: जाणून घ्या राजस्थान विरुद्ध गुजरात सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL-2022) स्पर्धेत यंदा नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या संघाने पहिल्या सत्रातच आपली छाप पाडली आहे. या संघाने पहिले तीन सामने जिंकले, पण चौथ्या सामन्यात त्यांना पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली.

IPL 2022 RR vs GT Live Streaming: जाणून घ्या राजस्थान विरुद्ध गुजरात सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
Rajasthan Royals VS Gujarat TitansImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 8:00 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL-2022) स्पर्धेत यंदा नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या संघाने पहिल्या सत्रातच आपली छाप पाडली आहे. या संघाने पहिले तीन सामने जिंकले, पण चौथ्या सामन्यात त्यांना पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली. शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने त्यांचा पराभव केला. मात्र उर्वरित सामन्यांप्रमाणे हा सामनाही अतिशय रोमांचक झाला. हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाशी होता. मात्र आता गुजरातच्या संघाला तगड्या संघासोबत दोन हात करावे लागणार आहेत. आता त्यांच्या पुढील सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातचा सामना संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होणार आहे. राजस्थानचा संघदेखील सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यांनी शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. RR सघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

गुणतालिकेत राजस्थान आणि गुजरात या दोन संघांचे स्थान पाहिल्यास राजस्थानचा संघ चार सामन्यांत तीन विजय आणि एक पराभवासह पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरात टायटन्सचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. चार सामन्यांत त्यांनादेखील तीन विजय आणि एका परभावाचा सामना करावा लागला आहे. गुण सारखे असले तरी नेट रनरेट कमी असल्यामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर हे दोन्ही संघ भिडणार असून एक अटीतटीचा सामना सर्वांना पाहायला मिळेल. मागील सामन्यात याच मैदानावर हैदराबादने गुजरातचा पराभव केला होता.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

राजस्थान रॉयल्स आणि लखनौ गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 14 एप्रिल (सोमवार) रोजी खेळवला जाणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता

इतर बातम्या

IPL 2022 Points Table: आयपीएलच्या गुणतालिकेत तुमचा संघ कुठे, तुमच्या आवडत्या संघाची आगेकुच की पिछेहाट?, जाणून घ्या

IPL 2022 MI vs PBKS Live Streaming: जाणून घ्या मुंबई विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, Orange Cap, Purple cap : 9 षटकार मारुन उथप्पाची आगेकुच, ऑरेंज कॅपच्या यादीत कोण आहे पुढे? पर्पल कॅपवर कुणाचं राज्य?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.