IPL 2022 RR vs RCB Live Streaming: जाणून घ्या राजस्थान विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

राजस्थानचा संघ तगडा आहे. या संघाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची फलंदाजी खूपच मजबूत दिसते. मुंबईविरुद्ध जॉस बटलरने शानदार शतक झळकावले. देवदत्त पडिक्कल, कर्णधार संजू सॅमसनही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

IPL 2022 RR vs RCB Live Streaming: जाणून घ्या राजस्थान विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना होणार.Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 8:00 AM

मुंबई : आयपीएल-2022 (IPL 2022) मध्ये मंगळवारी दोन तगड्या संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. हे दोन्ही संघ यंदाच्या हंगामात आतापर्यंतचे मजबूत संघ मानले जात आहेत. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी (Royal Challengers Bangalore) होणार आहे. राजस्थानचा संघ दोन सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे तर आरसीबीचा दोन सामन्यांपैकी एक विजय आणि एक पराभवासह सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. तर बंगळुरूचा संघ कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून आज आपला तिसरा सामना खेळणार आहे. राजस्थानने मुंबईविरुद्ध ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यानंतर राजस्थानची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.

राजस्थानचा संघ तगडा आहे. या संघाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची फलंदाजी खूपच मजबूत दिसते. मुंबईविरुद्ध जॉस बटलरने शानदार शतक झळकावले. देवदत्त पडिक्कल, कर्णधार संजू सॅमसनही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याचबरोबर शिमरॉन हेटमायरने खालच्या क्रमांकावर गेल्या दोन सामन्यांमध्ये तुफानी खेळी केली आहे. संजू आणि हेटमायरचा स्ट्राईक रेट जबरदस्त आहे. राजस्थान या सामन्यात बदल करू शकतो. आतापर्यंत त्यांनी फक्त तीन परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. या सामन्यात संघ व्यवस्थापन रियान परागला बाहेर बसवून रॅसी वान डर डुसेन याला संधी देऊ शकतं.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 5 एप्रिल (मंगळवारी) रोजी खेळवला जाणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता

इतर बातम्या

IPL 2022: Mumbai Indians ने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली, ज्याला सोडलं, त्यानेच घातला धुमाकूळ

Ruturaj Gaikwad CSK IPL 2022: चेन्नईच्या स्टारची अपयशाची हॅट्ट्रिक, मैदानावर 4 चेंडूंपेक्षा जास्त टिकणं झालं कठीण

IPL 2022 points table : चेन्नईची पराभवाची हॅट्रिक, पंजाबचा मोठा विजय, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....