IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक स्टाक क्रिकेटपटू UNSOLD ठरले. कोणीही त्यांच्यावर बोली लावली नाही.
या अनसोल्ड क्रिकेटपटूंमध्ये बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसनही आहे. लिलावात शाकिबची बेस प्राइस दोन कोटी रुपये होती.
शाकिब अल हसन मागच्या सीजनमध्ये केकेआरचा भाग होता. पण यावेळी केकेआरने त्याच्यावर बोली लावली नाही.
लिलावात कोणीही बोली न लावल्यामुळे शाकिबवर अनेकांनी टीका केली. त्यावर शाकिबची पत्नी साकिब उम्मे अल हसनने टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
"पूर्ण सीजन उपलब्ध राहणार का? यासाठी साकिबकडे दोन फ्रेंचायजींनी विचारणा केली होती. पण श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळायची असल्यामुळे तो पूर्ण सीजन उपलब्ध राहणार नव्हता".
"त्यासाठी शाकिबवर कुठल्या फ्रेंचायजीने बोली लावली नाही. हा काही मोठा विषय नाही" असं साकिब उम्मे अल हसनने तिच्या फेसबुक पेजमध्ये म्हटलं आहे. पुढच्यावर्षीही आयपीएल असणार आहे. शाकिबला कुठल्या फ्रेंचायजीने घेतलं असतं, तर त्याला श्रीलंका दौऱ्यावर पाणी सोडावं लागलं असतं" असं तिने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शाकिबची पत्नी नेहमीच टीकाकारांना उत्तर देत असते. शाकिबची उम्मे बरोबर पहिली भेट इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटच्या दरम्यान झाली होती.
12 डिसेंबर 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं. ढाक्यात एका हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडला होता. बांगलादेशच्या संघातील काही खेळाडू या लग्नाला उपस्थित होते.
शाकिब अल हसनने आतापर्यंत 71 आयपीएल सामन्यांमध्ये 124.48 च्या स्ट्राइक रेटने 793 धावा केल्या आहेत. त्याने दोन अर्धशतक झळकावली आहेत. गोलंदाजीमध्ये त्याने 29.19 च्या सरासरीने त्याने 63 विकेट घेतल्या आहेत.
शाकिब अल हसनचं बांगलादेश प्रिमियर लीगमध्येही दमदार प्रदर्शन सुरु आहे. फॉर्च्यून बारिशालसाठी त्याने 10 सामन्यात 30.77 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या आहेत.