मुंबई: सध्याच्या घडीला उमरान मलिक (Umran malik) हा क्रिकेट विश्वातला एक वेगवान गोलंदाज आहे. IPL 2022 स्पर्धा आपल्या वेगाने तो गाजवतोय. उमरान मलिकच्या नावाची भरपूर चर्चा आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेग फलंदाजांना धडकी भरवतोय. अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल होत आहेत. उमरानच्या वेगाची चर्चा फक्त आयपीएल पुरताच मर्यादीत नाहीय, तर शेजारच्या पाकिस्तानातही आता त्याच्या नावाची चर्चा सुरु झालीय. शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीबद्दल भाष्य केलय. उमरानच्या गोलंदाजीचा वेगच इतका आहे, की आता शोएबला त्याचा रेकॉर्ड तुटण्याची भीती सतावत आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड शोएब अख्तरच्या नावावर आहे. प्रत्येक सामन्यानिशी उमरानच्या गोलंदाजीचा वेग जसा वाढत चाललाय, तसा शोएबचा रेकॉर्डसाठी तो धोका बनत चाललाय.
उमरान मलिकने या सीजनमध्ये आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याने आधी 154 KMPH स्पीडने चेंडू टाकला. त्यानंतर 155 KMPH स्पीडने बॉल टाकला.
IPL 2022 मध्ये उमरानने 157 KMPH स्पीडने चेंडू टाकलाय. यापेक्षा जास्त वेगाने फक्त शॉन टेटने चेंडू टाकला होता. ज्याचा स्पीड 157.7 KMPH होता. म्हणजे फक्त पॉइंट 7 चा फरक आहे. पुढच्या सामन्यात उमरानने शॉन टेटला मागे टाकल्यास आश्चर्य वाटणार नाही. पाकिस्तानात असलेल्या शोएब अख्तरला याची जाणीव आहे. त्यामुळेच तो उमरानला चिथावणी देतोय, जेणेकरुन उमरानला दुखापत झाली पाहिजे व त्याचा रेकॉर्ड अबाधित राहिलं.
शोएब अख्तरच्या नावावर 161.3 KMPH स्पीडने चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. म्हणजे शोएबने उमरानपेक्षा 4.3 KMPH जास्त वेगाने चेंडू टाकलाय.
उमरान तुझा वेगवान चेंडूचा रेकॉर्ड मोडू शकतो का? असा थेट प्रश्न शोएबला विचारण्यात आला. त्यावर त्याने “उमरानने माझा रेकॉर्ड मोडला, तर मला आनंदच होईल. पण माझा रेकॉर्ड मोडण्याच्या नादात त्याने त्याची हाड मोडून घेतली नाही, म्हणजे मिळवलं” शोएब एकाबाजूला उमरानच कौतुक पण करतोय आणि दुसऱ्याबाजूला त्याच्या मनात भिती पण घालतोय. यातून शोएबला त्याच्या रेकॉर्डची चिंता जास्त सतावतेय हे स्पष्ट होतं.