IPL साठी बांगलादेश मालिका सोडणाऱ्या दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना कर्णधाराचा कडक इशारा, म्हणाला…
दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने हरवले. या मालिकेच्या निकालानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने (Dean Elgar) या कसोटी मालिकेऐवजी आयपीएल 2022 (South African Players in IPL 2022) खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या खेळाडूंना इशारा दिला आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने हरवले. या मालिकेच्या निकालानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने (Dean Elgar) या कसोटी मालिकेऐवजी आयपीएल 2022 (South African Players in IPL 2022) खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या खेळाडूंना इशारा दिला आहे. डीन एल्गर म्हणाला, “त्या खेळाडूंची पुन्हा संघात निवड होईल की नाही हे माहिती नाही, ही गोष्ट माझ्या हातात नाही.” दक्षिण आफ्रिकेच्या अनेक बड्या खेळाडूंनी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेऐवजी आयपीएल 2022 मध्ये खेळणे पसंत केले होते. दक्षिण आफ्रिकेचे (South Africa Cricket Team) संघ व्यवस्थापन या निर्णयावर खूश नसल्याचे बोलले जात आहे. या खेळाडूंमध्ये कागिसो रबाडा, मार्को यान्सन, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, रेसी व्हॅन डर डुसेन आणि एडन मार्कराम या नावांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेचा प्रशिक्षक मार्क बाउचर यानेदेखील कर्णधाराच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली. तो म्हणाला, ते खेळाडू आयपीएल खेळायला गेले आणि त्यांनी संघातली आपली जागा रिकामी केली. अनेक महत्त्वाचे खेळाडू नसतानाही दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत बांगलादेशचा आरामात पराभव केला. आमच्या फलंदाजांनी शानदार खेळ दाखवला. तसेच, फिरकीपटू केशव महाराजने दोन्ही कसोटींच्या चौथ्या डावात अप्रतिम गोलंदाजी करत बांगलादेशला 100 धावाही करू दिल्या नाहीत. याआधी बांगलादेशने वनडे मालिका 2-1 ने जिंकून आशा उंचावल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी 332 धावांनी जिंकली. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 220 धावांनी विजय मिळवला होता.
आयपीएल 2022 आधीच डीन एल्गरने इशारा दिला होता
दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल 2022 मध्ये खेळत आहेत याबद्दल पूर्वी बरीच वक्तव्ये आली होती. ही मालिका दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या देशभक्तीची कसोटी ठरेल, असे डीन एल्गरने मालिका सुरू होण्यापूर्वी म्हटले होते. या वक्तव्याद्वारे त्यांने खेळाडूंना अडचणीत आणले होते. मात्र नंतर एल्गरने आपलं मत बदललं. डीन एल्गरने पहिल्या कसोटीपूर्वी सांगितले होते की, त्याच्या सहकाऱ्यांनी आयपीएल निवडल्यास त्याला कोणतीही अडचण नाही. त्याने आपल्या पहिल्या वक्तव्याने खेळाडूंना अडचणीत आणले होते. पण तो त्यांच्याशी बोलला आणि त्यांच्या उत्तरांनी तो समाधानी आहे, असेही म्हणाला.
आयपीएल 2022 मध्ये खेळणारे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू
- क्विंटन डी कॉक – लखनौ सुपर जायंट्स
- डेव्हिड मिलर – गुजरात टायटन्स
- ड्वेन प्रिटोरियस – चेन्नई सुपर किंग्ज
- डेवाल्ड ब्रेविस – मुंबई इंडियन्स
- कागिसो रबाडा – पंजाब किंग्स
- रेसी व्हॅन डेर दुसेन – राजस्थान रॉयल्स
- एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी – दिल्ली कॅपिटल्स
- फाफ डु प्लेसिस – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
- मार्को यान्सन, एडन मार्कराम – सनरायझर्स हैदराबाद
इतर बातम्या
SRH vs GT Match Result: आज ती खूप आनंदी असेल, हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचं काय चुकलं?