IPL 2022 SRH vs GT Live Streaming: जाणून घ्या हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी तर चाललीच सोबत त्यांच्या गोलंदाजांनीदेखील चांगली कामगिरी केली. आता या स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक असलेल्या गुजरात टायटन्सचं (Gujarat Titans) हैदराबादसमोर मोठं आव्हान असेल.

IPL 2022 SRH vs GT Live Streaming: जाणून घ्या हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
SRH vs GT Image Credit source: SRH/GT (Twitter)
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 8:00 AM

मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) गुणतालिकेत आपलं खातं उघडलं. चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून त्यांनी आयपीएल-2022 मध्ये (IPL 2022) पहिला विजय मिळवला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील या संघाचा तीन सामन्यांतील हा पहिला विजय ठरला. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी तर चाललीच सोबत त्यांच्या गोलंदाजांनीदेखील चांगली कामगिरी केली. आता या स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक असलेल्या गुजरात टायटन्सचं (Gujarat Titans) हैदराबादसमोर मोठं आव्हान असेल. हैदराबद विरुद्ध गुजरात असा सामना सोमवारी नवी मुंबईतल्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गुजरात या मोसमातून आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे आणि सध्या हा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने या हंगामात आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत. सोमवारच्या सामन्यात हैदराबादसमोर गुजरातचं मोठं आव्हान असेल.

उभय संघांमधील हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

अशी असेल सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन

केन विल्यमसन (कर्णधार) अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को यान्सन, उमरान मलिक, टी. नटराजन.

हेदराबादविरुद्ध गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन

हार्दिक पंड्या, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे.

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 11 एप्रिल (सोमवार) रोजी खेळवला जाणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता

इतर बातम्या

RCB vs MI, IPL 2022 : सूर्यकुमारने एकट्याने RCBला शांत केलं, अर्धशतक ठोकले

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मैदानात उतरताच केला मोठा विक्रम, धोनी आणि रैनाच्या यादीत समावेश

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.