KKR vs SRH IPL 2022: नितीश राणाचा षटकार, डगआउटमधल्या फ्रीजची काच फुटली

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) मोठा विजय मिळवला. कोलकात्याने हैदराबादला विजयासाठी 20 षटकात 176 धावांचं लक्ष्य दिलं होतं.

KKR vs SRH IPL 2022: नितीश राणाचा षटकार, डगआउटमधल्या फ्रीजची काच फुटली
Nitish Rana destroys fridge with huge SixImage Credit source: IPL/Twitter
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 10:54 AM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) मोठा विजय मिळवला. कोलकात्याने हैदराबादला विजयासाठी 20 षटकात 176 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हैदराबादने 17.3 षटकात तीन बाद 176 धावा करुन हा सामना सहज जिंकला. या सामन्यात हैदराबादकडून सर्वाधिक 71 धावा राहुल त्रिपाठीने फटकावल्या. राहुलने 37 चेंडूत सहा षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 71 धावा कुटल्या. त्यापाठोपाठ 68 धावा एडन मार्करामने काढल्या. त्याने 36 बॉलमध्ये 68 धावा काढल्या. हा सामना जरी हैदराबादने जिंकला असला तरी कोलकात्याच्या एका फलंदाजाने लक्षवेधी खेळी केली. तो खेळाडू म्हणजे आक्रमक फलंदाज नितीश राणा. कोलकाताने 31 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत नितीश राणाने 36 चेंडूत 54 धावांची खेळी करताना संघाला सांभाळले. यादरम्यान त्याने 2 षटकार आणि 6 चौकारही लगावले. नितीशचा स्ट्राईक रेट 150 होता. नितीशने हैदराबादच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली.

150 च्या वेगाने टाकलेल्या चेंडूवर नितीशचा षटकार

आपल्या खेळीदरम्यान नितीश राणाने थेट डगआऊटमध्ये ठेवलेल्या फ्रीझवर षटकार मारला आणि फ्रीझची काच फोडली. नितीशने डावाच्या 13 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर हा षटकार लगावला. हे षटक आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाज उमरान मलिकने टाकले. मलिकने सुमारे 150 Kmh वेगाने चेंडू टाकला होता. त्यावर नितीश राणाने कट शॉट लगावला आणि थर्ड मॅनच्या दिशेने षटकार लगावला.

हा चेंडू सीमापार सनरायझर्सच्या डगआऊटमध्ये पडला. इथे एक फ्रीज ठेवण्यात आलं होता, ज्यावर हा चेंडू आदळला आणि फ्रीजची काच फुटली. त्याच षटकातील 5व्या चेंडूवर शेल्डन जॅक्सननेही उमरानच्या चेंडूवर षटकार ठोकला. हा चेंडू 140 च्या वेगाने टाकला होता.

हैदराबादचा मोठा विजय

हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजीचं निमंत्रण दिलं. कोलकताच्या संघाने निर्धारित 20 ओवरमध्ये 8 बाद 175 धावा केल्या. नितीश राणाने 36 बॉलमध्ये सर्वाधिक 54 धावा काढल्या. नितीशने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर आंद्रे रसेलने 25 बॉलमध्ये 49 धावा काढल्या. यामध्ये रसेलने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. तर श्रेयस अय्यरने 25 बॉलमध्ये 28 धावा काढल्या, त्यात 3 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर हैदराबादने 17.3 षटकात तीन बाद 176 धावा करुन हा सामना सहज जिंकला. या सामन्यात हैदराबादकडून सर्वाधिक 71 धावा राहुल त्रिपाठीने फटकावल्या.

इतर बातम्या

IPL 2022 DC vs RCB Live Streaming: जाणून घ्या दिल्ली विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, MI vs LSG : आज लखनौ मुंबईला रोखणार?, की इंडियन्सची विजयाची भूक यश खेचून नेणार?

IPL 2022, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवेळा पराभव, आज विजयश्री खेचून आणण्याची संधी

गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड....
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या.
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं.
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर.
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार.
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा.
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर.
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय..
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय...
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्..
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्...